शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

सागवानाची तस्करी करणारा मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:28 IST

पोलिसांना पाहताच वनतस्करांनी काढला पळ

देवरी(गोंदिया): शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली.देवरी पोलिसांचे एक पथक ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शेंडा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, पुतळीच्या जंगलातून जात असताना रस्त्याच्या एका बाजूला प्रकाशझोत दिसल्याने पोलीस पथक सतर्क झाले. त्या जागेचा कानोसा घेत पोलीस पथक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून वन तस्करांनी तिथून पळ काढला. मात्र, सागवानाचे सुमारे सहा लाकडे भरून असलेला मिनीट्रक (MH 35 K 5503) पोलिसांच्या हाती लागला. हा मिनीट्रक पोलिसांनी सडक अर्जूनी वनविभागाच्या स्वाधीन केला. त्यामुळे आता या प्रकरणात वनविभागाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेंडा आणि लगतच्या जंगलातून होणाऱ्या वनतस्करीवर वनविभागाचा वचक राहिला नसल्याने वनतस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा सडक अर्जूनी तालुक्यात आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी होत आहे. दरम्याने देवरी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.