लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही काही लोक रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्या लोकांना हाकलण्याचे काम पोलीस करीत आहेत. परंतु रात्रेंदिवस राबणाऱ्या या पोलिसांना आतापर्यंत ना मास्क,ना सॅनिटायझर देण्यात आले नाही. जनतेची सेवा करणाºया पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे.महाराष्ट्रासह गोंदिया जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदेशातून जिल्ह्यात आलेले व ते नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अश्या एकूण ६२७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु संचारबंदीत नागरिकांना फक्त जीवनावश्यक वस्तूच खेरदीसाठी जाता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तूची गरज नाही तरीही काही तरूण रस्त्यावरून इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत. गावागावातील लोक मजुरीसाठी बाहेर गावी गेले असताना ते आता गावात आले. त्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असली तरी ते घरातच राहात आहेत. तपासायला कुणी जात नाही. रूग्णालयात लोक गेले तरी त्यांना तिथे न तपासता गोळी देऊन त्यांना घरी पाठविले जात आहेत. त्यांच्या सानिध्यात आलेले लोक रस्त्यावर येऊन जीवनावश्यक किंवा औषध आणण्याचे कारण सांगून रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. याच दरम्यान पोलीस बंदोबस्त करीत असताना अनेक लोक पोलिसांच्या सानिध्यात येत आहेत. पोलिसांना शासनानकडून मास्क किंवा सॅनिटायझर देणे अपेक्षीत होते. परंतु त्यांना काहीच देण्यात आले नाही. पोलिसांना मास्क न दिल्यामुळे स्वत:चा बचाव म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल बांधले आहे. परंतु २४ तास नोकरी करणाºया पोलिसांना दिवसाला जास्तवेळ बंदोबस्तात राहताना हात नाकाला, तोंडाला किंवा डोळ्याला लागतोच. त्यांचे हात स्वच्छ असावे यासाठी सॅनिटायझर सोडा साधे साबणही उपलब्ध करण्यात आले नाही.संचारबंदीमुळे शहरासह ग्रामीण भागातही लॉक डाऊनकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मंगळवारी (दि.२४) सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातही लॉक डाऊनचे चित्र होते. तर काही भागात अद्यापही नागरिकांनी संचारबंदीला गांर्भियाने घेतले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची सुध्दा नागरिकांची समजूत घालताना चांगलीच दमछाक झाली.संचारबंदीत मुक्तसंचार करणाऱ्यांचा करावा बंदोबस्तशासनाने संचारबंदी लागू केली तरीही अनेक लोक कारण नसताना रस्त्यावर येत आहे.पोलीस यंत्रणा चौकात येऊन अनेकांना विचारपूस करीत आहे. परंतु पोलीस यंत्रणा तोकडी असल्यामुळे पोलिसांचा ज्या चौकात बंदोबस्त आहे. त्या चौकाला सोडून दुसºया चौकातून लोक जात आहेत. काही लोक स्वहिताची व देशहितासाठी नैतिक जबाबदारी पाळतांना दिसत नाही.
पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST
महाराष्ट्रासह गोंदिया जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदेशातून जिल्ह्यात आलेले व ते नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अश्या एकूण ६२७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु संचारबंदीत नागरिकांना फक्त जीवनावश्यक वस्तूच खेरदीसाठी जाता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तूची गरज नाही तरीही काही तरूण रस्त्यावरून इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत.
पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर
ठळक मुद्देना मास्क ना सॅनिटायझर : पोलिसांचेही व्हावे कोरोनापासून संरक्षण, दखल घेणार का