शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासभत्यापासून पोलीस पाटील वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस पाटीलांचे पद्दे रिक्त आहेत. देवरी उपविभागीय कार्यालयातंर्गत आमगाव, देवरी,सालेकसा आणि चिचगढ यातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रकिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देआंदोलन छेडण्याचा निर्धार : पोलीस पाटील संघटनेच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : गोरेगाव तालुक्यातील चुलबंद रोपवाटीका मुरदोली येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगगराज परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक रविवारी पार पडली.या वेळी उपाध्यक्ष दिलीप मेश्राम, कोषाध्यक्ष रमेश टेंभरे, सचिव रामजी झिंगरे, राजेश बन्सोड, महिला अध्यक्षा नंदा ठाकरे,उपाध्यक्ष अनिता लंजे, सहसचिव बाळकृष्ण शहारे, विलास साखरे उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस पाटीलांचे पद्दे रिक्त आहेत. देवरी उपविभागीय कार्यालयातंर्गत आमगाव, देवरी,सालेकसा आणि चिचगढ यातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रकिया सुरू झाली आहे. केशोरी २१ नवेगांवबांध १४, अर्जुनीमोरगाव १२, डुग्गीपार १२ गोरेगाव ९, तिरोडा १२ अशा अनेक ठिकाणी पोलीस पाटीलांचे पदे रिक्त आहेत. एक पोलीस पाटील अनेक गावांचा पदभार सांभाळून शासनास सहयोग करतो. यापैकी काही पोलीस स्टेशन नक्षल प्रभावित असल्याने पोलीस पाटलांना संवेदनशीलता ठेऊन गांवात काम करावे लागते. पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवासभत्या पासून वंचित का ठेवले जाते असा सवाल भृंगराज परशुरामकर यांनी उपस्थित केला. दिलीप मेश्राम यांनी सागीतले की संघटनेने १ जानेवारी २०१२ ते २०१६ पर्यंतच्या जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा मिटींगचा प्रवास भता मिळवून दिला. पोलीस पाटील व्हिजीट बुक पोलीस स्टेशनला ठेवण्याचे निर्देश दिले.पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. पोलीस पाटलांचा थकीत प्रवास भत्ता त्वरीत न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या वेळी गजानन जांभूळकर, टिकाराम कापगते, बनमाली मंडल,चंद्रहास भांडारकर, लोकचंद भांडारकर,परिमल ठाकूरउपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक