शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बालघाट जिल्ह्यात पोलिस नक्षल चकमक, ४ नलक्षवादी ठार

By अंकुश गुंडावार | Updated: June 14, 2025 20:16 IST

मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश : चामा दादर जंगल परिसरातील घटना

गोंदिया : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर तालुक्यातील चामा दादर जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती बालघाट येथील नक्षलविरोधी हॅक फोर्सला मिळाली. याच माहितीच्या आधारावर शनिवारी (दि.१४) हॅक फोर्सने या जंगल परिसरात सर्च मोहीम राबविली. या दरम्यान हॅक फोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ नलक्षवादी ठार झाले असून यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या घटनेला बालघाटचे पोलिस अधीक्षक यांनी दुजोरा दिला आहे.

बालाघाट येथील नक्षलविरोधी हॅकफोर्सला चामा दादर जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बालाघाट पोलिस व हॅक फोर्सने या जंगलात शनिवारी पहाटेपासून सर्च मोहीम राबविली. ही सर्च मोहीम राबवित असताना दुपारच्या सुमारास जंगलात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी सुध्दा याचे प्रत्युत्तर देत गोळीबार केला. पोलिस आणि नलक्षवादी यांच्यात पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या चकमकीत ३ महिला व १ पुरुष नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत काही नलक्षवादी सुध्दा जखमी झाले असल्याची माहिती आहे. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविली जात आहे.

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे व्टिट

मध्यप्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बालघाट जिल्ह्यात पोलिस आणि नलक्षवादी यांच्यात रविवारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असल्याच्या घटनेला व्टिट करुन दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात मध्यप्रदेशाला २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने नक्षलविरोधी मोहीम सुरु असल्याचे म्हटले आहे.

घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्तबालाघाट जिल्ह्यातील चामा दादर जंगलात शनिवारी (दि.१४) पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार नलक्षवादी ठार झाले. तर घटनास्थळावरुन रॉकेट लॉचंर, शस्त्र व स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मध्यप्रदेश सरकारकडून सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgondiya-acगोंदिया