शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस क्वार्टरला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:56 IST

येथील पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस क्वार्टरमधील रहिवासी पोलीस कर्मचारी विष्णू राठोड यांच्या क्वार्टरला (घराला) मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सामानाची चांगलीच नासधूस झाली.

ठळक मुद्देचिचगड येथील घटना : शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : येथील पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस क्वार्टरमधील रहिवासी पोलीस कर्मचारी विष्णू राठोड यांच्या क्वार्टरला (घराला) मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सामानाची चांगलीच नासधूस झाली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने नुकसान वाढले नाही.चिचगड पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १० घरांची चाळ आहे. यातीलच गणूटोला एओपीमध्ये कार्यरत विष्णू राठोड यांच्या घराला मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान आग लागली. चिचगड पोलीस ठाण्यात कार्यरत मनिषा राठोड या त्यांच्या पत्नी यावेळी घरी होत्या. त्यांना आग दिसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात कळविले व ठाणेदार नागेश भास्कर यांनी लगेच देवरी नगर पंचायतमधील अग्निशामक बोलाविले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले स्वत: घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या मदतीने लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तरिही राठोड यांच्या घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. शॉटसर्कीटने ही आग लागल्याचा अंदाज वतर्विला जात आहे.मोठा अनर्थ टळलाआग लागली तेव्हा राठोड यांच्या घरात दोन गॅस सिलिंडर ठेवलेले होते. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने हे सिलिंडर बाहेर काढण्यात आले. सिलिंडरला आग लागून स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र अग्निशामक व पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने आग नियंत्रणात आली व मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fireआगPoliceपोलिस