शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घाटकुरोडा रेती घाटावरून तीन टिप्परसह पोकलॅन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:11 IST

तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोखलॅन तसेच १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देतिरोडा पोलिसांची कारवाई : रेतीचे अवैधपणे खनन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटकुरोडा रेतीघाटालगत साठवून ठेवलेल्या रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांनी मिळाली. या आधारावर तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोखलॅन तसेच १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी मोहमद शहिद मोहमद जयबून शेख, रा. खैरबोडी, नंदकिशोर रमेश उके, रा. चिरचाळबांध, डालीराम तिडके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घाटकुरोडा रेतीघाट हा जिल्ह्यातील सर्वात मोठा रेतीघाट आहे. मागील काही दिवसांपासून या रेतीघाटावरुन अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू होते. मात्र महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या परिसरात रेतीमाफीयांचे मोठे प्रस्थ निर्माण झाले होते. रेती तस्करांनी कारवाई टाळण्यासाठी रेतीघाटालगत मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे उभारून ठेवले होते. तसेच संधी साधून या रेतीची रात्रीच्या वेळेस वाहतूक केली जात होती. मात्र आत्तापर्यंत रेती माफीयांवर कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास या रेतीघाटावरुन रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गवते यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनचा संपूर्ण ताफा घेवून घाटकुरोडा रेती घाटावर धाड टाकली. या दरम्यान पोकलॅन्डव्दारे तीन टिप्परमध्ये रेती भरुन वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी रेतीची वाहतूक करणारे तीन टिप्पर व दोन पोकलॅन व १०५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे रेतीची अवैध वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :sandवाळू