अर्जुनी मोरगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव सुरू असल्याने मानवाचे जगणे हलाखीचे झाले, माणूस फारच चिंतामयी आणि बेजार झालाय, असाच संदर्भ घेऊन मानवी जीवन आणि कोरोना काळ या विषयाच्या, विविध बोलीभाषांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कवींनी आपल्या कविता ऑनलाईन गाजवल्या आहेत.
कविसंमेलनाचे उद्घाटन भंडाऱ्याचे प्रसिद्ध कवी, लेखक व साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी आभासी पध्दतीने केले. नागपूरचे प्रसिद्ध कवी, लेखक, साहित्यिक व कलावंत डाॅ. बळवंत भोयर यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख भाष्यकार, प्रसिद्ध लेखक प्रा. डाॅ. अनमोल शेंडे चंद्रपूर, तसेच कविसंमेलनाचे मुख्य सूत्रधार, मार्गदर्शक, प्रसिद्ध कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी गोदिंया यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मीनाक्षी शहारे, जितेंद्र भोयर, अनुपमा जाधव, चित्रा क्षीरसागर, सिद्धेश राजाराम पाटील, काजल नंदरधने, सुरेश मोटघरे, संजय हत्तीमारे, अंगुलीमाल उराडे, राहुल दहिवले, नरेश जाधव, कालिदास सूर्यवंशी, अतुल ढोणे, मंजूषा कऊटकर, कळमेश्वर, महेंद्र गोंडाणे, सरताज साखरे, संजय शिवरकर चंद्रपूर, प्रकाश कांबळे, अरुण गोडे, संगीता वाईकर, नागेश वाहुरवाघ, प्रेरणा प्रदीप, रमेश बेलगे, पी.जी.भामोदे अकोला, निर्मला भामोदे, मनीषा महेंद्र घरडे, सिद्धार्थ चौधरी, सुषमा ढवळे, विनोद राधेलाल मोहबे, महेंद्र कोल्हटकर, राहुल शेंडे, वर्षा सगदेव, संदीप मेश्राम, गौरव लुटे आदी कवी महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रपूरच्या कवयित्री सीमा भसारकर यांनी केले. आयोजन सुकेशिनी बोरकर, रतन लांडगे, शैलेंद्र बोरकर, प्रियांका वंजारी, मनोज भगत, संगम नंदागवळी, गुरुदेव रामटेके, के. ए. रंगारी, चेतन नंदागवळी, बंसोड यांनी सहकार्य केले.