शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

नळधारकांची आर्थिक लूट

By admin | Updated: October 31, 2015 02:44 IST

अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नळधारकांची खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने आर्थिक लूट करणे सुरू केले आहे.

नागरिकांचा आरोप : प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाचा गैरकारभारगोठणगाव : अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नळधारकांची खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने आर्थिक लूट करणे सुरू केले आहे. सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाने सप्टेंबर २०११ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत विद्युत बिलाच्या ५० टक्के अनुदानावर योजना चालविली जात होती. पण थकीत विद्युत बिलामुळे योजना बंद होती. त्यावेळी पाणी पट्टी ८० रूपयेप्रमाणे प्रति महिना वसुली होत असे. बंद पडलेली योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जलस्वराज्य योजनेमध्ये समाविष्ट केले. ५ मे २०१५ पासून सदर योजनेचा विद्युत बिल शंभर टक्के व तुटफूट दुरूस्त्या शासनाकडून खर्च केल्या जाते. तरी पण संबंधित प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने पाणी पट्टीकर कमी केले नाही. यावरून नळधारकांची लूट होत असल्याचे नळ धारकांकडून बोलल्या जात आहे. अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकडे एकूण एक हजार ३५० नळ कनेक्शन सुरू आहेत. त्यांचे ८० रूपये प्रमाणे एकूण मासिक वसुली सरासरी एक लाख आठ हजार रूपये होते. त्यापैकी सरासरी ४० हजार रूपये नोकर पगारावर खर्च केल्या जाते. उर्वरित ६८ हजार रूपये घशात उतरविले जात आहे.या प्रकारामुळे नळधारक नागरिकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)वैऱ्याने साधला डावथकीत बिलामुळे बंद असलेली योजना जिल्हा परिषद प्रशासनाने स्वत:कडे हस्तांतरित केली. १०० टक्के विद्युत बिल व तुटफूट दुरूस्त्यावर खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. हे लक्षात येताच संबंधित मंडळाने अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षाला मंडळ बरखास्त झाल्याचे लिहून घेतले आणि डाव साधला. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंडळ बरखास्तीचा ठराव नसताना लेखी निवेदनावर अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त सहीविना असलेले पत्र कसे मंजूर केले, हे एक कोडेच आहे. वास्तविक जिल्हा परिषदेने योजना स्वत:कडे हस्तांतरित केल्यानंतर योजना चालविण्यासंबंधी नियमाने निविदा काढायला हवी होती. निविदेच्या माध्यमातून जो कुणी येईल त्यांना देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता सरळ खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आले. पाणीपट्टी वसूली मात्र अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या नावाने वसूल केल्या जाते. नियमाला डावलण्यात आल्याचा आरोप नळधारकांनी केला आहे.