शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातशेवरुन प्लॅटफार्म तिकीट विक्री ८५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने गुरूवारपासून येथील रेल्वे ...

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : दरवाढ आणि कोरोनाचा प्रवाशांनी घेतला धसका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने गुरूवारपासून येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले. याचा पहिल्याच दिवशी परिणाम दिसून आला. दररोज ७०० प्लॅटफार्म तिकीटांची विक्री एकदम ८५ वर आली असून दरवाढीचा प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर परिणाम दिसून आला.महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. रेल्वे स्थानकावर सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रवाशी आणि त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी होत असते.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे रेल्वे गाड्या धावतात. तसेच दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होत असते. तर बरेच जण प्लॅटफार्म तिकीट काढून आपल्या नातेवाईक अथवा मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येत असतात. प्लॅटफार्म तिकीट केवळ दहा रुपयाला मिळत असल्याने ते कुणीही सहज काढत होते. मात्र रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी गुरूवारपासून येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले. त्यामुळे अनेक जणांनी रेल्वे स्थानकावर न जाताच बाहेरून सोडून जाणे पसंत केले. त्यामुळे दररोज ७०० प्लॅटफार्म तिकीटांची होणारी विक्री एकदम ८५ तिकीटांवर आली.कोरोनामुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दी सुध्दा कमी झाली असून अनेकांनी आपले प्रवासाचे नियोजित वेळापत्रक रद्द केले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसात २४०० वर प्रवाशांनी आरक्षीत तिकीट रद्द केले. रेल्वे आरक्षण तिकीटाच्या १० लाख रुपयांचा परतावा केला आहे.तर गोंदिया रेल्वे स्थानकावरील सहा आरक्षण खिडक्यांवर प्रवाशांचा शुकशुकाट होता.दोन प्रवाशात १ मिटरचे अंतरगोंदिया रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्री केंद्र आणि रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांमध्ये १ मिटरचे अंतर राहावे यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. यासाठी एक एक मिटर अंतरावर लाल रंगाची लाईन ओढून तशी व्यवस्था करण्यात आली होती. ही सर्व उपाय योजना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाचे मुकेश कुमार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.लांब अंतरावरील रेल्वे गाड्या रद्दकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. याच पार्श्वभुमीवर हमसफर एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, समता एक्सप्रेस आणि हावडा-मुंबई, मुंबई-हावडा या रेल्वे गाड्या सुध्दा रद्द करण्यात आल्या आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे