शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लागवड उसाची नोंद धानाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

शेतकरी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन आपल्या कुटुंबासह राबतात.मात्र शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आल्यानंतर त्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर सुध्दा डल्ला मारण्याचा प्रयत्न काही व्यापारी करीत आहे.

ठळक मुद्देधान खरेदी केंद्रावर गौडबंगाल : जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास घोळ येईल बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दराने धान खरेदी करुन त्याची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबारा गोळा करुन उसाऐवजी धानाची लागवड केल्याची नोंद करुन धानाची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास यातील मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता आहे.शेतकरी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन आपल्या कुटुंबासह राबतात.मात्र शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आल्यानंतर त्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर सुध्दा डल्ला मारण्याचा प्रयत्न काही व्यापारी करीत आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दराने धानाची खरेदी करुन हाच धान शासकीय धान खरेदी केंद्रावर काही व्यापाऱ्यांनी विकल्याची माहिती आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना प्रती क्विंटल शंभर रुपये देण्याचे आमीष देऊन त्यांचे सातबारा गोळा केले.विशेष म्हणजे हे सातबारा गोळा करताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाची लागवड केली आहे त्यांच्या सातबारा तलाठ्याच्या मदतीने धानाची लागवड केल्याची नोंद केली. याच सातबारावर शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी काही केंद्रावरील कर्मचाऱ्यांची सुध्दा मदत घेतल्याचे बोलले जाते. हा प्रकार सर्वाधिक धान उत्पादक तालुके असलेल्या अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या नोंदी नुसार गेल्या हंगामात १५०० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली होती. कोणत्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली याची नोंद सुध्दा कृषी विभाग आणि तलाठी कार्यालयाकडे आहे.मात्र प्रत्यक्षात सातबारावर पीक लागवड नोंद करताना त्यात ऊसाची लागवड केली असताना धानाची लागवड केल्याचा सातबारा तयार करुन दिला.व्यापाऱ्यांनी असेच सातबारा जमा करुन याच मदतीने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर जमा करण्यात आलेले सातबारा आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कोणत्या पिकाची लागवड केली आहे याची सखोल चौकशी केल्यास खरे गौडंबगाल पुढे येण्याची शक्यता आहे. शेतकºयाचा नावावर फायदा घेणाऱ्यांचा खरा चेहरा सुध्दा सामोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.लगतच्या राज्यातील धान गोंदियातशासकीय धान खरेदी केंद्रावरील गौडबंगालाची सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे गबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून कमी दराचा धान आणून त्याची जिल्ह्यातील काही धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.याला एका व्यापाऱ्यांनेच नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केल्यास भिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.सहकारी संस्थेच्या सभेत गाजला होता मुद्दाअर्जुनी मोरगाव येथे काही दिवसांपूर्वी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर बाहेरील जिल्हा आणि राज्यातून धान आणून विक्री करण्यात आल्याची बाब लक्षात आणून दिली होती. त्यामुळे संबंधित विभागाने सुध्दा हा मुद्दा गांर्भियाने घेण्याची गरज आहे.शेतकऱ्यांच्या कोऱ्या विड्रॉलवर सह्याव्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत त्यांना आमिष दाखवित त्यांचे सातबारा गोळा करुन त्यांच्या नावावर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या बँका खात्यावर जमा होत असल्याने चुकारे जमा झाल्यानंतर ते पैसे विड्राल करता यावे, यासाठी शेतकºयांच्या कोऱ्या विड्रालवर सह्या आधीच घेवून ठेवल्याची माहिती आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती