शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

पिंपळ, वडाची रोपवाटिका मुरदोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:17 IST

तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे. या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग : विविध भागात होणार पुरवठा, प्रयोगाचे सर्वत्र कौतुक

दिलीप चव्हाण ।ऑनलाईन लोकमतगोरेगाव : तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे. या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.विशेष म्हणजे पिंपळ व वडाचे रोपटे जगत नाही तर पक्ष्यांनी पिंपळ व वडाचे बियाणे खाल्यावर जी विष्ठा बाहेर पडते त्या विष्ठेतूनच पिंपळ व वडाचे झाड तयार होत असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे पिंपळ व वडाचे रोप लावण्याचा प्रयोग कधीच रोपवाटीकेत आत्तापर्यंत यशस्वी झालेला नाही.मुरदोलीच्या रोपवाटिेकेत हा प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी रोपवाटिका मुरदोली येथे आहे. घनदाट जंगलात ही रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेची देखरेख वनरक्षक डी.बी. तुरकर वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. वनरक्षक डी.बी. तुरकर यांच्या कार्यकुशलतेमुळे पिंपळ व वडाचे रोपटे तयार करुन जगविण्यात यश आले आहे. या रोपवाटिकेत सागवान, बांबू, हिरडा, बेहळा, आंजन, जांभुळ, सिताफळ, सिसू, खैरे, सिसम, मोहाई, सिवन, पारस, पिंपळ, अमलतास, कवट, आपटा, आंबा, विजा, गुलमोहर, बदाम, सासा, करु, सिरस, रिठा, सिंदूर, उतरणजीवा, चिंच, कंरजी, चार, बेल, वड असे एकूण २ लाख ७२ हजार सहाशे पंचवीस रोपटे तयार करण्यात आले आहे.२०१६-१७ या वर्षात वडाचे ३२०० व पिंपळाचे ८०० रोपटे जगविण्यात आली आहे. या रोपट्यांचे संवर्धन वनविभागाने केले आहे. वड व पिंपळाचे रोपटे जगविल्याने जगत नाही मात्र आमच्या टिम वर्कमुळे ते यशस्वी झाले आहे. यासाठी वनसंरक्षक गोंदियाचे एस.युवराज, सहायक वनसंरक्षक एन.एच. शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.-एस.एम. जाधववनक्षेत्राधिकारी, गोरेगाव.असे तयार होते रोपटेवड आणि पिंपळाचे पिकलेले फळ सुखविले जाते. बियाणे सुखल्यानंतर वाफे तयार केले जाते व त्या वाफ्यांमध्ये ताजे शेण व बियाणे मिश्रन करुन टाकण्यात येते. या प्रक्रियेनंतर पाच दिवस पाणी दिले जात नाही. सहाव्या दिवशी वाफ्यावर पाणी टाकून गवताने झाकले जाते. २० ते २५ दिवसात अंकुर आल्यावर रुट ट्रेनर ब्लॉकमध्ये ते रोप जगविले जाते. एक महिन्यानंतर रोपटे पालीथिनमध्ये मातीच्या मिश्रणात घेतले जाते. वड व पिंपळाचे झाड बियाणांपासून जगविण्यासाठी तशी वातावरण निर्मितीही केली जाते. वड व पिंपळाचे बियाणे जानेवारी ते मार्चपर्यंतच उपलब्ध असतात. अतिसुक्ष्म बियाणे हाताळतांना खूप काळजी घ्यावी लागते हे विशेष.पक्ष्यांसाठी पाण्याची सोयमुरदोली जंगल परिसरातील पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. मुरदोली रोपवाटिकेत ठिकठिकाणी पाण्याचे पॉट लावण्यात आले.