लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : निसर्ग निर्मित वनसंपदेची पुरेपूर माहिती व्हावी या उद्देशातून वनविभागाच्यावतीने येथील शासकीय आश्रमशाळेतील ४७ विद्यार्थ्यांची सहल नवेगावबांध अभयारण्यात नेण्यात आली होती. यावेळी सरपंच मोहनलाल बोरकर, मुख्याध्यापक एम.डी.बारसागडे, शिक्षक के.बी.चव्हाण, देशमुख व वनकर्मचारी उपस्थित होते.निसर्गाने मनुष्याला जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारच्या झाडांची उत्पत्ती करुन दिली आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी इमारत बांधकामासाठी तसेच औषधी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. परंतु आपणास याची जाणीव नसते. विद्यार्थ्यांना वनस्पतीची जाणीव झाल्यास ते इतरांना मार्गदर्शन करुन कशाप्रकारे वृक्ष चिरकाल टिकेल हे विद्यार्थ्याना सांगण्यात आले. नवेगावबांध अभयारण्यात असलेल्या सागवान, साजा, तिवस, सिंसम, आवळा, हिरडा, बेहळा, निम, सुबाभूळ, निलगीरी यासारख्या अनेक झाडांची माहिती व त्यांची उपयोगीता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना सांगीतली. त्याचप्रमाणे मानवी जीवनाचा विचार करुन पृथ्वीतलावर निसर्गाने वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांची निर्मिती केली. मात्र आपण त्यांची सर्रास कत्तल करतो, परिणामी पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. त्याचप्रमाणे औषधीयुक्त वनसंपदा नष्ट होत आहे. यावर तत्काळ निर्बंध लावणे गरजेचे आहे, अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा सल्लाही सहलीअंती देण्यात आला. या सहलीचा संपूर्ण खर्च वनविभागानेच वहन केला.
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:30 IST
निसर्ग निर्मित वनसंपदेची पुरेपूर माहिती व्हावी या उद्देशातून वनविभागाच्यावतीने येथील शासकीय आश्रमशाळेतील ४७ विद्यार्थ्यांची सहल नवेगावबांध अभयारण्यात नेण्यात आली होती. यावेळी सरपंच मोहनलाल बोरकर, मुख्याध्यापक एम.डी.बारसागडे, शिक्षक के.बी.चव्हाण, देशमुख व वनकर्मचारी उपस्थित होते.
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची सहल
ठळक मुद्देवनविभागाचा पुढाकार : वनसंपदेची दिली माहिती