शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शेंगा पोखरणाऱ्या अळींचे तुरीवर आक्रमण

By admin | Updated: January 9, 2016 02:15 IST

सद्यस्थितीत तुर पिकावर कळी व फूल गळतीच्या अनेक समस्या आहेत. त्यात नैसर्गिक कारणांशिवाय पाण्याचा ताण,

कृषी विभाग झाला सज्ज : आठवड्यातून एकदा हेक्टरी २० ते २४ झाडांचे निरीक्षण गरजेचेगोंदिया : सद्यस्थितीत तुर पिकावर कळी व फूल गळतीच्या अनेक समस्या आहेत. त्यात नैसर्गिक कारणांशिवाय पाण्याचा ताण, अन्नद्रव्यांची कमतरता व अळींचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत. अळींच्या आक्रमनामुळे तुर पिकांवर संकट ओढवले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी पाने गुंडाळणारी अळी, तर पीक कळी, फुलोरा व शेंगा लागलेल्या अवस्थेत शेंगा पोखरणारी हिरवी अळी (घाटे अळी), पिसारी पतंग व शेंगमाशीच्या अळीचा प्रादुर्भाव नुकसानदायक ठरतो. त्यांच्या नियंत्रणाकडे लक्ष देण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा हेक्टरी २० ते २४ झाडांचे सर्वेक्षण स्वरूपात निरीक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे किडीचा अंदाज लक्षात घेवून उपाययोजना करणे सोयीचे होते. तुर पिकामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यात शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीस घाटेअळी, हिरवी अमेरिकन बोंड अळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही कीड बहुवनस्पती भक्षी आहे. मादी पतंग कोवळी पाने, कळ्या व शेंगावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीची कोवळी पाने, कळ्या व फुले खावून नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून शेंगांच्या आत शिरते व शेंगातील दाणे खावून टाकते. त्यावेळी तिचे अर्धे शरीर शेंगाबाहेर राहते. अशाप्रकारे एक अळी सहा ते १६ तुरीच्या शेंगांचे नुकसान करते.पिसारीपतंग ही दुसऱ्या प्रकारची अळी असून या अळीच्या अंगावर सूक्ष्म काटे व केश असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. तिसऱ्या प्रकारची अळी म्हणजे शेंगमाशी. या किडीचा तुर पिकांचे नुकसान करण्यात आशिया खंडात घाटे अळीनंतर दुसरा क्रमांक लागतो. या माशीची अळी बारिक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाचे असून तिला पाय नसतात. ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते.कृषी विभागाच्या वतीने तुर पीक वाचविण्यासाठी शेतकरी बांधवांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)किडींचे एकात्मिक व्यवस्थापन१. शेतामध्ये हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. त्यामुळे अळ्यांचे परभक्षक असलेले पक्षी अळ्या वेचण्याचे काम करतात. २. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करून नष्ट कराव्यात. ३. हेक्टरी २०-२४ कामगंध सापळे पिकात उभारावेत. त्यामुळे किडीचे काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. ४. गुंडाळलेली पाने वेचून नष्ट करावी. ५. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर, किडींना झाडावर अंडी घालण्यापासून रोखण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यामुळे फार मदत होते. शेवटचा पर्यायकिडींच्या एकात्मिक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करूनही शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास शेवटच्या पर्यायाचा अवलंब करावा. यात गरजेनुसार पहिली फवारणी करावी. यात ५० टक्के झाडांना फुले आल्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी इमामोक्टीन बेन्जोएट पाच टक्के, एसजी ४.४ टक्के ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यानंतर गरज भासल्यास दुसरी फवारणी करावी. यात १५ दिवसांनी लॅबडा सायहॅलोथ्रीन पाच टक्के, प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तुरीसारख्या मोठ्या पिकांमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार एकरी २५० ते ३०० लिटर पाण्याचा वापर करावा.