शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:57 IST

Gondia : मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकड़े जाते. चेहरा म्हणजेच आपली ओळख जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : 'चॅटजीपीटी'च्या नवीन 'घिबली' इमेज जनरेटरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. केंद्रातील नेत्यांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उद्योजकांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच घिबल इमेजमध्ये आपला फोटो असावा, असे वाटत आहे. तुम्हीही याच्या मोहात पडला असाल ना। थोर्ड थांबा, कारण या फोटोच्या नादात तुमची खासगी माहिती तर कोणी चोरत नाही ना, याचा विचार करून योग्य ती खबरदारी घ्या असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. 

सायवर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या वैयक्तिक माहितीचा अॅक्सेस थर्ड पार्टी अॅपला देत आहोत. त्यामुळे आपली खासगी माहितीच नाही तर आपले फोटोदेखील संबंधित एआय टूल्सला सहजतेने मिळत आहेत. ती माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर संपूर्ण माहिती आपल्या चेहऱ्यासह डार्क वेबला विकली जाऊ शकते. लॅपटॉप, कॉम्प्युटर यापेक्षा मोबाइलद्वारेच अनेक गोष्टींचा वापर शक्य झाला आहे. मोबाइलमध्ये अॅप इन्स्टॉल केल्यानंतर आपण ऑल परमीशन्स देतो, अॅपचे अॅग्रिमेंट कोणी वाचत नाही. त्यामुळे मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकडे आते. त्यात घिवलीमध्ये आपण आपला फोटो अपलोड करतो, चेहरा म्हणजेच आपली ओळख असते. 

....तर गंभीर परिणाम होतीलअनेक कंपन्यांमध्ये फेस रीडिंगद्वारेच कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. घिबली किंवा इतर कोणतीही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. ही वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजेच आपल्या चेहऱ्याची ओळख एआय कंपन्यांना आपणच देत असतो. ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर चोरीला जाण्यापेक्षाही जास्त धोकादायक मानली जाते. कारण पासवर्ड बदलता येतो; पण चेहरा बदलता येत नाही. तुमच्या चेहऱ्याचा डेटा चोरीला जाऊन त्याचा गैरवापर होऊ शकतो.

डार्क वेब म्हणजे काय?डार्क वेब इंटरनेटचा असा भाग आहे जिथे फक्त गैर अथवा अनधिकृत धंदे चालतात. आपण जे इंटरनेट वापरतो तो वेबच्या एकूण जगाचा फारच लहान भाग आहे. पुढे आलेल्या एका माहितीनुसार, ९० टक्के इंटरनेट आजही लपलेले आहे, त्यालाच डार्क वेब असे म्हणतात. डार्क वेबमध्ये सर्व प्रकारच्या पेजचा समावेश आहे, जे सर्च इंजिन शोधू शकत नाही. 

विशेष काळजी घ्यावीएखाद्या नेत्याचे वक्तव्य मोडतोड करून, त्यांच्याच चेहऱ्यावर त्यांच्याच आवाजात हुबेहूब व्हिडीओद्वारे प्रसारित होऊ शकते 

"अनेक राजकीय नेतेमंडळींच्या सोशल मीडियावर 'घिबली'चे फोटो दिसत आहेत. 'एआय'चा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. आवाज आणि फोटो घेऊन 'एआय'च्या माध्यमातून पाहिजे तो व्हिडीओ बनवला जाऊ शकतो. अॅपद्वारे जाहिराती बनवून बदनामी केली जाऊ शकते. अॅप्लिकेशन्स वापरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे."- अशोक गेडाम, सायबर सेल प्रमुख

टॅग्स :gondiya-acगोंदियाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स