शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

सर्व रुग्णालयाचे त्वरित फायर ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 5:00 AM

तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून, पेडियाट्रिक वार्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून, प्राणवायू प्रकल्पनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्राजक्ता लवंगारे : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे, तसेच आरोग्य सुविधेत वाढ करून रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि.३०) त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी यंत्रणेला सूचना केल्या. या दौऱ्यात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राणवायू निर्मिती प्लांट, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते. जिल्हाभरात कोविड केअर सेंटरमध्ये ९२२ खाटा उपलब्ध असून, त्यापैकी ३२५ खाटा ऑक्सिजनच्या आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्यात आल्याची माहिती दिली. 

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी - लसीकरणामध्ये जिल्ह्याचे काम चांगले असून, जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ३ लाख ८८ हजार २० व कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख २३ हजार २१०, असे एकूण ६ लाख ११ हजार २३० डोस प्राप्त झाले. आतापर्यंत ५ लाख ७५ हजार ८५८ व्यक्तींनी लस घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ५७ हजार ५७९, तर दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार २८८ आहे. जिल्ह्यात सध्या दहा क्रियाशील रुग्ण असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१९ टक्के, तर रिकव्हरी रेट ९८.२३ टक्के आहे.कुशल मनुष्यबळाची आवश्यकता- तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून, पेडियाट्रिक वार्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून, प्राणवायू प्रकल्पनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.आशा वर्कर यांचा योग्य सन्मान करा- कोविडकाळात आशा वर्कर यांनी उत्कृष्ट काम केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी निदर्शनास आणून दिले असता कोरोनाकाळात आशा वर्कर यांनी सर्वच ठिकाणी चांगले काम केल्याचे नमूद करून आशा वर्कर खऱ्या कोरोना योद्धा आहेत असे लवंगारे म्हणाल्या. सर्व आशा वर्कर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याच्या सूचना केल्या. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य