शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

गुणवत्तेसाठी जनतेने बांधकामांकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:19 IST

गेल्या वर्षभरापासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे शहरातील बांधकामे रखडली होती. आता त्या प्रकरणाचा निकाल नगर पालिकेच्या बाजूने लागला. पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२० कोटी रूपयांच्या विविध कामांचे संयुक्त भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या वर्षभरापासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे शहरातील बांधकामे रखडली होती. आता त्या प्रकरणाचा निकाल नगर पालिकेच्या बाजूने लागला. पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यातून सिमेंट रस्ते, बगीचे आणि हुतात्मा स्मारकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याकरिता नगर पालिका सदस्य आणि नागरिकांनी सहकार्य करावे. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी जनतेने थर्ड पार्टी म्हणून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.गोंदिया शहराच्या विविध प्रभागात विकासकामे मंजूर झाली आहेत. ती कामे २० कोटी रूपयांची आहेत. या कामांचे संयुक्त भूमिपूजन सोमवारी (दि.१६) सकाळी १२ वाजता गांधी प्रतिमा चौकात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती शकील मंसुरी, सभापती रत्नमाला शाहू, सभापती दीपक बोबडे, सभापती विमल मानकर, गटनेता घनश्याम पानतावणे, गट नेता सतीश देशमुख, स्थायी समिती सदस्य सुनील तिवारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.इंगळे म्हणाले, २० कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन ही शहरवासीयांना छोटी भेट आहे. आता येत्या काळात असे अनेक भव्य आणि पालिकेच्या इतिहासात नोंदवली जाणारी कामे होतील. जनतेने विकासकामांच्या नावावर आम्हाला सत्ता दिली आहे. त्यांचा विश्वास आम्ही तळाला जाऊ देणार नाही. नगर पालिकेतील सदस्य यांनी देखील शहर विकासात राजकारण न आणता विकासकामांत सहकार्य करावे. या कामामुळे नागरिकांना थोडा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शहर विकासात तेवढे सहकार्य अपेक्षीत आहे.असे सांगून ते म्हणाले, शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नम्रतेने काम केल्यास सर्व कामे मार्गी लागतात, हा माझा अनुभव आहे. मी नगर पालिकेत काम करीत असताना चौथी पिढी आहे. त्यामुळे आता पालिकेत सदस्य असलेल्या सर्वांनी विकासकार्यात एकजूट आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन देखील अशोक इंगळे यांनी केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी मांडले. संचालन प्रशासकीय अधिकारी राणे यांनी केले. या वेळी नगरसेवक हेमंत पंधरे, कुंदा पंचबुद्धे,विवेक मिश्रा, अनिता मेश्राम, अफसना बेगम मुजीब पठान, भावना कदम, क्रांतिकुमार जयस्वाल, शिलू चव्हाण, श्वेता पुरोहित, जितेंद्र पंचबुद्धे, मैथुला बिसेन, हेमलता पतेह, धर्मेश अग्रवाल, मोसमी परिहार, सुनील भालेराव, गौसिया बेगम कलाम शेख, नितु बिरीया, दिलीप गोपलानी, वर्षा खरोले, नेहा नायक, मालती कापसे, दीपिका रु से, भागवत मेश्राम, दिनेश दादरीवल, भरत क्षत्रिय, पराग अग्रवाल, राकेश ठाकूर, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, दीपक कदम, भाजप जिल्हा महासचिव अमृत इंगळे, प्रदीप सिंग, अहमद मणियार, नंदू बिसेन, विजेंद्र जैन, प्रदीप ठाकरे, संजय कुलकर्णी, बालू बिसेन, विनोद किराड, चंद्रभान तरोने, मनोहर आस्वानी, ऋषी साहू, अभय मानकर, रतन वासनिक, दीपम देशमुख, पप्पू अरोरा, मुजीब पठान, पप्पू जसानी, पंकज खोब्रागडे, टेकचंद फेडारकार, राजू शुक्ला, जयंत शुक्ला, योगु गिरीया, संजय मुरकुटे, अशोक जियसंघनी, जगदीश मिश्रा, योगराज रहांगडाले, मनोज मेंढे, सोनू सावंत, बाल्या केकत, राहुल लोहाना, योगेश गिरीया, सुमीत तिवारी, पुष्कर सावंत, भरत कानोजिया, दुर्गेश रहांगडाले, राजा कदम आदी उपस्थित होते.