गोंदिया : गोंदिया शहर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागल्या गेला आहे. गोंदिया शहर व रामनगर हे दोन पोलीस ठाणे गोंदिया शहराची गस्त घालतात. या शहराची देखरेख करण्यासाठी पोलिसांना आठ दुचाकी तर चार चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीसाठी चार दुचाकी, दोन चारचाकी वाहन देण्यात आले आहे. याच संख्येत वाहने रामनगर पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. एका दुचाकीवर दोन पोलीस कर्मचारी, तर चार चाकी वाहनावर तीन पोलीस कर्मचारी गस्त घालतात. रात्री बेरात्री हस्तक्षेपीय गुन्हा, दरोडा, घरफाेडी किंवा घातपाताच्या तयारीत असलेल्या आरोपींवर करडी नजर ठेवण्यासाठी कमीत कमी २८ कर्मचारी या दोन्ही पोलीस ठाण्यांतर्गत गस्त घालतात. शिवाय एलसीबी, विशेष पथक व पोलीस अधीक्षकांचे पथक रात्रगस्त गोंदिया शहरात करते. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करण्यात येते. यापूर्वी विविध गुन्ह्यात अडकलेले गुन्हेगारांची तपासणी रात्रीच्यावेळी पोलीस विभाग करतो.
बॉक्स
गेल्या वर्षात.... शहरात चोऱ्या, घरफोड्या
बॉक्स
सतत गस्त घालून गुन्हेगारांवर नजर ठेवली जाते
लोकमतने केलेल्या पाहणीत गोंदिया व रामनगर पोलीस नियमितपणे गोंदिया शहरात गस्त घालतात. ज्या-ज्या भागात घरफोेड्या झाल्या, गंभीर गुन्हे घडले. दरोडे झाले त्या परिसरात पोलिसांची गस्त कायम असते. शिवाय रेल्वेस्थानक, बसस्थानक व रेसिडेंट भागातही पोलिसांची गस्त असते. पोलीस ठराविक वेळी त्याच ठिकाणी जात नाही तर आरोपींची माहिती मिळावी, संशयितांना पकडता यावे यासाठी ते गस्त घालतात.
बॉक्स
पोलीस ठाण्यातून ठरविले जाते वाहनांना थांबण्याचे ठिकाण
कोणते वाहन कोणत्या चौकातून जाईल. कोणत्या परिसरात कोण गस्त घालेल. कोणते वाहन कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबेल याची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्या सूचनेनुसार वाहन घेऊन जाणारे कर्मचारी त्या नियोजनाने गस्त घालण्याचे काम करतात.
-- १२ वाहनातून पोलीस गस्त
--८ दुचाकी वाहनातून गस्त
--४ चारचाकी वाहनातून गस्त
--२८ कर्मचारी घालतात गस्त
कोट
रात्र गस्त करण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. जुन्या घटना ज्या ठिकाणी घटना घडल्या असतील त्या ठिकाणी, दरोडे झाले ते ठिकाण, शिवाय बाहेरून शहरात आरोपी येऊ शकतात अशा ठिकाणी पोलीस गस्त घालतात. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गस्त घातली जाते.
-महेश बन्सोडे
पोलीस निरीक्षक गोंदिया शहर.