लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात रविवारी (दि.२३) आणखी २१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांनी एक हजाराचा पल्ला गाठला असून बाधित रूग्णांची एकूण संख्या १०१४ झाली आहे. यात क्रीयाशिल रूग्ण संख्या २५९ आहे. तर ३२ रूग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता रूग्ण बरे झाल्याची संख्या ७४२ झाली आहे.रविवारी आढळून आलेल्या २१ रूग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १५ रूग्ण, तिरोडा तालुक्यातील १ रूग्ण, गोरेगाव तालुक्यातील ३ रूग्ण, सडक-अर्जुनी तालुक्यातील १रूग्ण व १ रूग्ण भंडारा येथील आहे. या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १०१४ झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यातील ४१०, तिरोडा २६८, गोरेगाव ३५, आमगाव ७६, सालेकसा ४०, देवरी ४१, सडक-अर्जुनी ५६ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८२ तसेच बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले ६ रूग्ण आहे.तर रविवारी कोरोनावर मात करून घरी जाणाऱ्या ३२ रूग्णांमध्ये गोंदिया त् १०, तिरोडा १२, आमगाव ३, गोरेगाव १, सालेकसा ३, देवरी २ तर सडक-अर्जुनी तालुक्यातील १ रूग्ण आहे. अशाप्रकारे एकूण ७४२ रूग्ण आजपर्यत कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यातील २६७, तिरोडा २३०, गोरेगाव १७, आमगाव ४८, सालेकसा ३५, देवरी ४०, सडक-अर्जुनी ४४, अर्जुनी-मोरगाव ५७ आणि इतर ४ रु ग्णांचा समावेश आहे.विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १४ हजार १३१ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १२ हजार ७४० नमुने निगेटिव्ह आले. तर ७९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १८८ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ४०४ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. काही रुग्णांचे नमुने दोनदा घेण्यात आल्यामुळे रुग्णांपेक्षा पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या जास्त आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात ७३ व्यक्ती आणि गृह विलगीकरणात ९४७ व्यक्ती अशा एकूण १०२० व्यक्ती विलगीकरणात आहेत. संसर्ग बाधित रूग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ८५६८ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ८३४६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २२२ व्यक्तींचे अहवाल पॉझििटव्ह आढळून आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ७९ चमू आणि ६५पर्यवेक्षक १३७ कंटेन्मेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगरपालिका- नगरपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून तेथे उपाययोजना केल्या जात आहेत.सर्वाधिक रूग्ण गोंदिया तालुक्यातीलजिल्ह्यात कोरोना क्रीयाशील रूग्ण संख्या २५९ असून यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १३७ रूग्ण, तिरोडा तालुक्यात ३२, गोरेगाव तालुक्यात १८, आमगाव तालुक्यात २८, सालेकसा तालुक्यात ५, देवरी तालुक्यात १, सडक-अर्जुनी तालुक्यात ११, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २५ आणि इतर २ आहेत. यामध्ये २५४ क्रि याशील रूग्ण जिल्ह्यात तर ५ रूग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.माताटोली परिसरातील रूग्णाचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर शनिवारी (दि.२२) रात्री शहरातील माताटोली परिसरातील ७५ वर्षीय वृद्धाचा येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता मृतांची संख्या १३ झाली आहे.
रूग्ण संख्या हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST
रविवारी आढळून आलेल्या २१ रूग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १५ रूग्ण, तिरोडा तालुक्यातील १ रूग्ण, गोरेगाव तालुक्यातील ३ रूग्ण, सडक-अर्जुनी तालुक्यातील १रूग्ण व १ रूग्ण भंडारा येथील आहे. या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १०१४ झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यातील ४१०, तिरोडा २६८, गोरेगाव ३५, आमगाव ७६, सालेकसा ४०, देवरी ४१, सडक-अर्जुनी ५६ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८२ तसेच बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले ६ रूग्ण आहे.
रूग्ण संख्या हजार पार
ठळक मुद्देजिल्ह्यात २१ रूग्णांची वाढ : ३२ रु ग्ण झाले कोरोनामुक्त