लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शहरासह संपूर्ण विदर्भात शाळा संचालकांकडून सीबीसीएसई पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा पालकांकडून भरपूर शुल्क वसूल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी या प्रकरणाची शिक्षण सचिव, उपसंचालक, विभागीय सचिव आणि शिक्षणाधकारी यांची एक चमू तयार करुन पालकांची फसवणूक करणाऱ्या सर्व शाळा संचालकांविरुद्ध भादंवीच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, ३१ जानेवारी २०१७ रोजी सीबीएसई बोर्ड नवी दिल्लीचे सहसचिव एम.के.श्रीवास्तव यांनी या संबंधात एक नोटीफिकेशन काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत सीबीएसईकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत कोणतेही शाळा संचालक आपल्या शाळेतील बोर्डावर, जाहिरातींवर किंवा पत्रकांवर ‘सीबीएसई पॅटर्न’ या नावाचा वापर करुन शकत नाही. तरी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून गावापासून तर शहरापर्यंत जो कोणी इंग्रजी शाळा सुरु करतो तो आपल्या शाळेत ‘सीबीएसई पॅटर्न’चे नाव लिहून पालकांची सर्रास फसवणूक करित असल्याचे चित्र आहे.पालकांनी सुध्दा कोणत्याही इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याचे प्रवेश घेताना शाळा संचालकांना शाळेचा सीबीएसईचा परवाना क्रमांक व कागदपत्रांची तपासणी करावी. ज्या शाळेला सीबीएसईची परवानगी असेल तर पालकांनी वेबसाईटवर जाऊन सदर शाळेची मान्यतेची खात्री करावी ज्या शाळेला परवानगी असेल त्या शाळेचे नाव या वेबसाईटवर निश्चित मिळेल.या प्रकरणाची शिक्षण विभागाशी संबंधीत सचिव, उपसंचालक विभागीय सचिव आणि शिक्षणाधिकारी यांची एक चमू तयार करुन अशा सीबीसएसई पॅटर्न लिहणाºया शाळा संचालिकांविरुध्द ४२० अन्वये गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक तथा उद्योगपती अग्रवाल व इतर पालकांनी केली आहे.
‘सीबीएसई’ नावाखाली पालकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:18 IST
शहरासह संपूर्ण विदर्भात शाळा संचालकांकडून सीबीसीएसई पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा पालकांकडून भरपूर शुल्क वसूल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘सीबीएसई’ नावाखाली पालकांची फसवणूक
ठळक मुद्देशाळा संचालकांची मनमानी : फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी