गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया येथील सभागृहात आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्यांच्यासाठी पंचकर्मची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ६० डॉक्टरांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ३३ आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये आता पंचकर्मसारख्या महत्वाच्या उपचार पद्धतीची सोय होणार आहे.प्राचीन चिकीत्सा प्रणालीला चालना मिळावी, रूग्णांना पंचकर्मचा फायदा मिळावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय तिरोडा, ग्रामीण रूग्णालय आमगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध यामध्ये आयुष सेवा मिळत आहे. जिल्ह्यातील ३३ आयुर्वेदीक दवाखान्यात पंचकर्माची सोय करण्यात आली आहे. प्राचीन चिकीत्सेकडे जनतेचा कल असावा यासाठी आयुष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेची सुरूवात धन्वंतरी पुजनाने झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवी धकाते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. त्रिपाठी उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी एम.एस. आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या प्रा. वंदना अलोनी, वृषाली सोनवाने, नागपूरचे अन्वर सिद्दीकी, वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ. मीना वट्टी यांनी मांडली. आभार जिल्हा साथरोग अधिकारी भूमेश पटले यांनी मानले. यशस्वीतेसाठी अर्व आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सरकारी दवाखान्यातही पंचकर्म
By admin | Updated: January 27, 2015 23:36 IST