पालखी यात्रा : येथील दुर्गा चौक स्थित मा जगदंबा धाम मंदिरात गुप्त नवरात्र उत्सव थाटात साजरा केला जात आहे. या नवरात्रौत्सवांतर्गत रविवारी मंदिरात ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शहरात दुर्गा मातेची पालखी यात्रा काढण्यात आली. सकाळी मंदिरातून निघालेली ही पालखी यात्रा शहरातील मुख्य मार्गाने गेली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत डोक्यावर कलश धारण करून असलेल्या महिलांसह मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाले होते.
पालखी यात्रा :
By admin | Updated: July 27, 2015 02:41 IST