शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी प्रकरण ; सोसायटीच्या 15 संचालकांवर झाला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 21:32 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित सोसायटीवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांच्या हक्काचे धान घेताना शेतकऱ्यांना लुबाडणे व शासनालाही लुटणे, या दोन्ही गोष्टी एकाच सोबत करणाऱ्या सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादित सालेकसा, नोंदणी क्रमांक १०७० च्या अध्यक्ष, सचिवासह १५ संचालक मंडळावर फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (दि. १४) दाखल करण्यात आला. या आरोपीवर जिल्हा पणन अधिकारी  मनोज बाजपेयी (४९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधीन राहून धान खरेदी करायची होती. पणन हंगाम २०२१-२२ मध्ये या संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डीओप्रमाणे भरडाई करण्याकरिता राईस मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक आहे; परंतु दिलेल्या डीओप्रमाणे समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना धान उचल दिला नाही. डीओ दिलेले मिलर्स यांनी धान उचल देत नसल्याबाबत जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांच्याकडे लेखी तक्रार केली. समृद्ध किसान संस्थेस वेळोवेळी धान उचल देण्याकरिता नोटीस देण्यात आल्या आहेत. संस्थेकडून नोटीसचे उत्तर देण्यात आले नाही व धान उचलही देण्यात आले नाही. यासाठी संस्थेच्या गोदामांमध्ये धान साठ्याची पाहणी करण्याकरिता  १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान मार्केटिंग अधिकारी मनाेज बाजपेयी, सहायक निबंधक, सालेकसा, श्रेणी- १ संजय गायधने, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय यशवंत देशमुख, ज्ञानदेव तनपुरे, हरीष चेटुले पाहणी करण्यास गेले असता  समृद्ध किसान संस्थेने भाड्याने घेतलेल्या साकरीटोला येथील उर्मिला दोनोडे यांच्या मालकीचे गोदाम व रोंढा येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीचे गोदामात  ८ हजार क्विंटल धान नव्हता. त्या धानाची किंमत १ कोटी ५५ लाख २० हजार रुपये सांगितले जाते.

‘लोकमत’ने उघड केला होता घोळ - जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित सोसायटीवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

हंगाम २०२१-२२ मधील धानाची केली अफरातफर 

- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडसोबत समृद्ध किसान संस्था सालेकसा या संस्थेने पणन महासंघासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियम व अटीच्या अधीन राहून धान खरेदीचे कार्य करायचे होते; परंतु तसे न करता पणन हंगाम २०२१-२२ मध्ये सदर संस्थेने शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक करण्याची पूर्ण जबाबदारी येते. खरेदी केलेला धान पणन महासंघाच्या देण्यात आलेल्या डीओप्रमाणे भरडाई करण्याकरिता मिलधारकांना धानाची उचल देणे बंधनकारक असताना  डीओप्रमाणे धान समृद्ध किसान संस्था, सालेकसा यांनी मिलर्सना दिलेच नाही. गोदामात धान शिल्लकच नव्हते.

त्या पाच संस्थाही रडारवर शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार जिल्ह्यातील सहा केंद्रांवर आढळला होता. यापैकी एका सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित पाच संस्थांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आरोपीत यांचा समावेश - वासुदेव महादेव चुटे (रा. आमगाव खुर्द, सालेकसा), भोजलाल अंतुलाल बघेले, (रा. घोंशी), घनश्याम बहेकार (रा. ईसनाटोला),  रोशनलाल वसंतराव राणे (रा. लोहारा), प्रेमलाल तुरकर, घनश्याम नागपुरे (रा. मुंडीपार), राजेंद्र बहेकार (रा. बोदलबोडी), खेमराज उपराडे (रा. मुंडीपार), दालचंद मोहारे (रा. गोवारीटोला), ग्यानीराम नोणारे (रा. भजेपार), उमेश लहू वलथरे (मु.पो. गिरोला), व्यवस्थापक जगदीश खोब्रागडे (रा. सालेकसा), ग्रेडर अजय भरत फुंडे (रा. आमगाव खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड