शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्टपूर्तीनंतर धान खरेदी झाली बंद : शेतकरी अडचणीत ; १५ लाख क्विंटलचे वाढवून मागितले उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:21 IST

Gondia : ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामात ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट सोमवारी पूर्ण झाल्याने फेडरेशनने मंगळवारपासून (दि. १७) धान खरेदी बंद केली. यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, शासन धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देणार याकडे त्यांच्या नजरा लागल्या आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते. यंदा रब्बी हंगामात शासनाने फेडरेशनला ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. तसेच शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. १५ जून ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. या कालावधीत जिल्ह्यातील ४६ हजार ५३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, तर यापैकी २४ हजार शेतकऱ्यांनी ११ लाख क्विंटल धानाची हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली. तर २२ हजारावर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. यंदा शासनाने रब्बी हंगामात केवळ ११ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. तर जिल्ह्यात ४६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. तर रब्बीत धानाचे उत्पादनदेखील झाले. तसेच बाजारपेठेत धानाचे दर कमी असल्याने शेतकरी हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी केंद्रावर नेत आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील आवक वाढून लवकरच उद्दिष्ट पूर्ण झाले.

फेडरेशनने वाढवून मागितले उद्दिष्टनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २२ हजारांवर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. अजून जवळपास १५ लाख क्विंटलवर धान खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १५ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी शासनाला पाठविलेल्या पत्रातून केली आहे. ३० जूनपर्यंत धान खरेदीची मुदत असल्याने शासन उद्दिष्ट वाढवून देते काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अन्यथा बसेल शेतकऱ्यांना फटकाबाजारपेठेत सध्या धानाचा दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल आहे, तर हमीभाव २३०० प्रतिक्विंटल आहे. शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्यास शेतकऱ्यांना गरजेपोटी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपये नुकसान सहन करून खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागेल.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती