शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

धान उत्पादकांची सर्वांकडूनच लूट

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा

खरेदीचा तिढा कायम : व्यापाऱ्यांसोबत बाजार समित्यांतही कमी भावाने खरेदीगोंदिया : शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा धान मनमानी भावाने खरेदी केला जात आहे. दुसरीकडे काही ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही हमीभावाला बगल देत कमी दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी वर्ग सर्वत्र नागवला जात आहे.आमगाव : यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. हातात आलेले पीक योग्य भावाने विकून आर्थिक चणचण दूर करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी आखले होते. मात्र शासनाच्या धोरणाने त्यांचे नियोजन पार कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून स्वत:वरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी धान विक्रीसाठी काढले आहे. परंतु आधारभूत किंमत जाहीर करूनही आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने गरजवंत शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीला बळी पडून कवडीमोल भावाने धानाची विक्री करीत आहे.आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वरदान ठरली आहे. शेतकरी दरवर्षी उत्पादित धानाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीमध्ये विक्रीला आणतात. परंतु व्यवसायिकांची मक्तेदारी वाढल्याने शेतकऱ्यांचे धान कवडीमोल भावाने खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आमगाव बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबरपासून शेतकऱ्यांनी धान विक्रीला सुरूवात केली. जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस, एक हजार दहा, एक हजार एक, आयआर या जातीचे धान बाजार समितीत विक्रीला आले. १ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत एकूण २९८० क्विंटल धान विक्री करण्यात आले. बाजार समितीत व्यापाऱ्यांची मक्तेदारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना धानाचे आधारभूत मुल्यच मिळत नाही. त्यामुळे जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस या जातीच्या धानाला किमान १४३९ ते २६७५ पर्यंत तर हलक्या जातीच्या धानाला १२०० ते १२८० पर्यंत भाव दिला जात आहे. बाजार समितीत व्यावसायिक शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला ओलसर व नरम असल्याचे कारण पुढे करून धानाला कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे अपेक्षित किमतीला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. त्यामुळे धान उत्पादनासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासही ते असमर्थ ठरत आहेत. हातात पिक असूनसुध्दा किंमत मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली सापडण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)