शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील दोन हजारांवर संस्था केवळ कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:20 IST

सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची मोहीम : अनेक संस्थांना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध प्रकारच्या अनियमितता, गैरव्यवहार आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली असून, अनेक संस्थांना नोटीस बजावली आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये कार्यरत संस्थांची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः शासकीय सवलतींचा लाभ घेतलेल्या संस्थेकडे अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. यात बऱ्याच संस्था केवळ नावापुरत्या कार्यरत असल्याची बाब पुढे आली आहे. संस्थांनी मागील काही वर्षांपासून धर्मादाय कायद्यानुसार विश्वस्त बदल अर्ज, संस्थेच्या मालमत्ता जाणूनबुजून अभिलेख्यावर घेतल्या नाहीत, वार्षिक उत्पन्न खर्चाचा लेखा तपशील वर्षानुवर्षे जमा केलेला नाही, तसेच धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर कर्ज घेणे वा संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली जात असल्याचे देखील चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. 

जिल्ह्यात १० हजारांहून अधिक संस्थागोंदिया जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत. या संस्थांमध्ये मंदिर, मशीद, चर्च, शाळा-महाविद्यालय, हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि अन्य प्रकारच्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे. परंतु, त्यातील काही संस्था प्रत्यक्षात केवळ कागदावर अस्तित्वात आहे. अशा संस्था वार्षिक उत्पन्नाचे अचूक लेखाजोखे सादर करत नाहीत आणि धर्मादाय कायद्याची सरळसरळ पायमल्ली करत आहेत. 

उत्पन्नाचा वैयक्तिक कामासाठी वापरकाही संस्थांनी धर्मादाय कार्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले असून, त्यात पारदर्शकता नसल्याचे सुध्दा पुढे आले आहे. विशेषतः शैक्षणिक संस्था. काही संस्था धर्मादाय उत्पन्नाचा वापर संस्था चालवण्यासाठी न करता वैयक्तिक हितासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नियमभंग करणाऱ्यांना संस्थाना नोटीसजी कोणती संस्था धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करीत आहे, अशा संस्थांना प्रथम नोटिसा पाठवून योग्य त्या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. जे संस्था प्रमुख किंवा विश्वस्त वारंवार सूचना देऊनही सहकार्य करत नाहीत, त्यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त कायद्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया