शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:50 IST

वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांकडून निविदाच नाहीत : महावितरण आले अडचणीत

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याने ते वेटींगवर आहेत.विशेष म्हणजे, महावितरणने या कामासाठी कित्येकदा निविदा काढली. मात्र त्यात कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आली नाही. यामुळे वीज जोडणी करून देण्याची इच्छा असतानाही महावितरणची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची फटका सहन करावा लागत आहे. यात एका पाण्याअभावी पीक हातून गेल्याचे चित्रही कित्येकदा बघावयास मिळाले आहे. अशात सिंचनाची मदत घेऊन पीक वाचविण्याची पाळी शेतकºयांवर येते.विहिरीचे पाणी घेण्यासाठी कृषी पंपाची गरज असते. मात्र ज्यांच्याकडे कृषी पंप नाही असे शेतकरी अवैधरित्या जोडणी घेऊन पाण्याची सोय करतात. हा प्रकार कित्येकदा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही प्रकार घडतात.यामुळेच महावितरणकडून शेतकºयांना स्वत:च्या हक्काचे कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. महावितरणचा हा सौदा फायद्याचा असल्याने शेतकºयांनीही हक्काच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले.त्यानुसार, मागील दोन वर्षांपासून महावितरणकडे सुमारे दोन हजार ७७९ अर्ज डिमांड भरलेले आहेत. या शेतकºयांना कृषी पंप जोडणी दिली जावी, यासाठी महावितरणने कित्येकदा निविदा काढली. मात्र कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आल्या नाहीत. अशात इच्छा असूनही महावितरणकडून जोडणी करण्यात आली नाही. परिणामी डिमांड भरूनही जिल्ह्यातील दोन हजार ७७९ शेतकरी वेटींगवरच आहेत.उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचडिव्हीएस) योजनेला सुरूवातशेतकºयांना योग्य दाब व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली (एचहिडीएस) योजना राबविली जाणार आहे. यासह अन्य २ योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यात, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेची जिल्ह्यातही सुरूवात करण्यात आला असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम झांजीया येथील शेतकरी जियालाल गणपत चन्ने यांना पहिले कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आता कृषी पंप वीज जोडणीचे काम गती घेणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण