शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

दुर्लक्षितपणामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने युध्द पातळीवर उपयायोजना केल्या. पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, तेलगंणा येथून रेल्वे मार्गाने पायी येणाºया मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मजुरांकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते.

ठळक मुद्देएकाच दिवशी तब्बल २६ रुग्णांची नोंद : जिल्हावासीयांमध्ये खळबळ, कोरोना बाधितांचा आकडा पोहचला २८ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमधील जिल्ह्यात मंगळवारी दोन रुग्ण आढळल्याने जिल्हा ग्रीन झोनमधून आॅरेंज झोनमध्ये परार्वतीत झाला. तर गुरूवारी (दि.२१) तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यातील २६ रुग्णांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा दोन वरुन आता २८ वर पोहचला आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यांमधून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याची ओरड आता होत आहे.जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने युध्द पातळीवर उपयायोजना केल्या. पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, तेलगंणा येथून रेल्वे मार्गाने पायी येणाऱ्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मजुरांकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. जिल्ह्यातील सीमा तपासणी नाक्यावर सुध्दा कठोरपणे तपासणी केली जात नव्हती. त्यामुळेच कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वाढली होती. लोकमतने सुध्दा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला होता. अखेर मुंबई येथून ट्रकने आलेल्या अर्जुनी मोरगाव ५० मजुरांपैकी १ मजुराला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी त्याचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच या मजुरांसह आलेल्या इतर ४९ मजुरांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते. तर बुधवारपर्यंत जिल्ह्यातील तीन आयसोलेशन कक्षात १३२ रुग्णांवर उपचार सुरू होता. तर ९६ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले असून यात तब्बल २६ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे दोन दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २८ पोहचली असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी कोरोना बाधीत आढळलले २६ कोरोना बाधीत हे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील आहे. या भागात आता उपाय योजना केल्या जात आहे.वाढता प्रादुर्भाव रोखणार कसाशासनाने राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली.तर मुंबई, पुणे येथून अजुनही बरेच मजूर पायीच आपल्या स्वगृही पोहचत आहे. केवळ शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी करणाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र जो मजूर पायीच आपल्या स्वगृही पोहचत आहे त्यांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने त्यांना क्वारंटाईन केले जात नाही. त्यामुळे थेट आपल्या घरी जात असून यामुळेच कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.आता जिल्हा कोणत्या झोनमध्येगोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र मंगळवारी जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमधून आॅरेंज झोनमध्ये परार्वतीत झाला. त्यानंतर गुरूवारी तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यात २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २८ पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा आता नेमका कोणत्या झोनमध्ये आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागूजिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनात सुध्दा खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात सायंकाळी ७ ते सकाळी या कालावधीत फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी सायंकाळी उशीरा काढले. त्यामुळे या कालावधीत बाहेर पडण्यास मनाई केली आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येईल.आयसोलेशन कक्षात १७७ जणजिल्ह्यातील चार आयसोलेशन कक्षात १७७ जणांवर उपचार सुरू आहे. सात क्वारंटाईन कक्षात ८३ जण दाखल आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५ तिरोडा १३, उपकेंद्र बिरसी ७, जलाराम लॉन ४, आदिवासी आश्रमशाळा ईळदा-४३ आणि डवा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेत ७ असे एकूण ८३ जण उपचार घेत आहेत. तर १२६ वर स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या