शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

२ लाख ४० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:49 IST

नुकसानभरपाईपोटी ८ कोटी ७५ लाख रुपये : अनेक शेतकरी लाभापासून राहिले वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात. गेल्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ रुपया भरून पिकांचा विमा काढला होता. खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखाही बसला होता; पण विमा कंपनीने २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ३५३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी पात्र ठरविले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ८ कोटी ७५ लाख ५६ हजार ६४५ रुपयांची मदत मंजूर केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास किमान त्यातून लागवड खर्च तरी भरून निघावा, यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात; पण गेल्या तीन-चार वर्षांचा अनुभव पाहता पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून पीकविमा कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी शेतकरी, केंद्र व राज्य शासन पीकविम्यापोटी कोट्यवधी रुपयांचे प्रीमियम विमा कंपन्यांकडे भरतात; पण नुकसान झाल्यानंतरही त्याचा परतावा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामापासून शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ रुपयात पीकविमा काढण्याची योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ५४७ शेतकऱ्यांनी प्रत्येकी १ रुपया भरून पिकांचा विमा काढला. खरीप हंगामात अवकाळी पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांवर हंगामाला मुकण्याची वेळ आली होती; पण पीकविमा कंपन्यांनी नुकसानभरपाईसाठी केवळ १९ हजार ३५३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत जवळपास २ लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून पीकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे.

पात्रतेचे निकष काय?विमा कंपन्या पीकविम्याचा लाभ देण्यासाठी वेगवेगळे निकष लावतात. यामुळे लाभासाठी फारच कमी शेतकरी पात्र होतात. विमा कंपनीचे निकष शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

पीकविम्याचा लाभ मिळालेले तालुकानिहाय शेतकरीतालुका                       मिळालेली मदत                              पात्र शेतकरीआमगाव                        २०१२९४५                                            ५९४अर्जुनी मो.                      ८३८९३                                                   ११देवरी                              ४६०५५९                                                ४६गोंदिया                           ५७१७१८२                                           १९७०गोरगाव                           ४५०३१८५                                            ८७५सडक अ.                        ६८७५६८                                               ८६सालेकसा                         १५२९६०९                                            ४८५तिरोडा                            ५७२४८९३६                                       १२०७४एकूण                      ८ कोटी ७५ लाख ५६ हजार                  १९३५३  

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमाgondiya-acगोंदिया