शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ लेकरांना आता मिळणार ‘ओळख’ : गोंदियात सुरू बालहित साथी मोहीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:53 IST

जिल्ह्यात साथी समिती स्थापन : सर्व्हे करून देणार सोयी सवलतींचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात १३ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान साथी मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत रस्त्यांवरील निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती सर्व्हे करून विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षाखालील निराधार बालकांना आधार कार्ड काढून देणार आहे.

गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख व इतर सेवा मिळणार आहे. ही मोहीम बालहित सर्वोपरी' या तत्त्वावर आधारित आहे. बालकांचे सर्वांगीण पुनर्वसन आणि विकास हे मुख्य उद्देश आहेत. ही मोहीम केवळ आधार कार्ड नोंदणीपुरती मर्यादित नसन यात मलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व कायदेशीर हक्कांचे संरक्षण व त्यांच्या पुनर्वसनासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे.

बैठकीत दिले निर्देशजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन.के. वाळके हे या समितीचे समन्वयक असून १२ जून रोजी या समितीची बैठक घेण्यात आली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गादर्शन करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पाहुणे निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे व अधिकारी उपस्थित होते.

या बालकांचा आहे समावेश१८ वर्षांखालील मुले ज्यांना कौटुंबिक आधार, पालकत्व किंवा निवारा, संरक्षण आणि आधाराचा स्रोत नाही, तसेच दुर्लक्षित रस्त्यावर राहणारी मुले, झोपडपड्यांमध्ये किंवा रेल्वेस्थानकावर राहणारी मुले, बालसंगोपन संस्थामध्ये राहणारी अनाथ मुले, बेघर मुले, बालकांच्या तस्करीतून सुटका झालेली बालके, निवारगृहे किंवा नोंदणी नसलेली बालसंगोपन गृहे आणि कुटुंबाला परत मिळाली नाहीत, अशा सर्व मुलांचे २६ जूनपर्यंत सर्वेक्षण करून त्यांना २५ पर्यंत आधार नोंदणीद्वारे आधार कार्ड व नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही समिती गोंदिया जिल्ह्यातील निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया