शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

३७ हजार ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी

By admin | Updated: October 17, 2016 00:28 IST

वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.

महावितरणची नवी योजना : १ नोव्हेंबरपासून होणार शुभारंभ गोंदिया : वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. महावितरणची ही नवी योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्राहकांनी जेवढ्या लवकर या योजनेचा लाभ घेतला, तेवढा जास्त लाभही योजना देणार आहे. वीजेचे देयक न भरल्याने त्यांची रक्कम वाढत जाते व देयक न भरल्याचा कालावधी वाढत गेल्यास वीज वितरण कंपनीकडून नाईलाजास्तव त्या ग्राहकांची कायमस्वरूपी वीज जोडणी खंडीत केली जाते. जिल्ह्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात असून अशा ग्राहकांची संख्या ३७ हजार ६३७ आहे. तर अशा या ग्राहकांवर २१ कोटी २८ लाख ५५ हजार २८५ रूपयांची थकबाकी असून त्यावर तीन कोटी ५४ लाख १० हजार ९८३ रूपयांचे व्याज थकून पडले आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने आणि मूळ व व्याजाची रक्कम मिळून एवढी रक्कम भरणे काहींच्या आवाक्याबाहेरही झाले असावे. परिणामी अशा या ग्राहकांकडून पुढाकार घेतला जात नाही. अशात वीज चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे प्रकारही घडतात. एकंदर यातून वीज कंपनीलाच फटका सहन करावा लागतो. शिवाय ग्राहकांना अंधारात ठेवणेही महावितरणच्या धोरणात नाही. अशात ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा उजळून निघावे व त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा यासाठी महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ‘अभय’ योजना आणली आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना राबविण्यात येणार असून सहा महिने कालावधीची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेत ग्राहकांना पुन्हा एकदा ‘अभय’ होण्याची संधी महावितरणकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे या योजनेतून कृषी व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आले असून फक्त कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. एकंदर ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली संधी चालून आहे. संधीचा लाभ घेऊन वीज पुरवठा खंडीत असलेले ग्राहक आपल्या घराला पुन्हा एकदा प्रकाशमय करू शकतील. (शहर प्रतिनिधी)