शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
3
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
4
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
7
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
8
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
9
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
10
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
11
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
12
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
13
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
14
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
15
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
16
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
17
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
18
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
19
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
20
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीला व्यापाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: January 24, 2015 01:18 IST

दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढत जात असतानाच या कर वसुलीचा मोहिमेचा व्यापाऱ्यांकडून विरोध वाढत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे.

गोंदिया : दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढत जात असतानाच या कर वसुलीचा मोहिमेचा व्यापाऱ्यांकडून विरोध वाढत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे. यामुळेच शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही व्यापाऱ्यांनी कर वसुली पथकासोबत हमरीतुमरी केल्याचा प्रकार घडला. तर एका प्रकरणात खुद्द नगराध्यक्षांनी संबंधीत व्यापाऱ्याची गॅरंटी घेतल्याचीही माहिती आहे. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेची कर वसुली मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही मोठ्या थकबाकीदारांकडे धडक दिली. यातील एका दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गेले असता संबंधीत व्यापाऱ्याने मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत कर वसुलीवरून बाचाबाची केली. ही बाचाबाची एवढी वाढली की त्या व्यापाऱ्याने पथकावर चक्क खुर्ची उचलली. बाचाबाचीचा हा प्रकार रिंग रोडवरील संत तुकाराम शाळेतही घडला. तर तेथून आल्यावर श्री टॉकीज रोडवरील बग्गा इलेक्ट्रॉनिक्समध्येही संचालकांनी मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत चांगलाच वाद घातला. यातून नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरातील थकबाकीदारांचा चांगलाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही पथकाने शुक्रवारी (दि.२३) तीन लाख ४५ हजार रूपयांची रोख, २६ हजार रूपयांचे धनादेश मिळवले. शिवाय पाच लाख १० हजार रूपयांचे पोस्ट डेटेड चेक सुद्धा पालिकेने मिळविले आहेत. (शहर प्रतिनिधी)पोलिसांशिवाय सुरू आहे कर वसुलीकर वसुलीची ही मोहीम पोलिसांशिवायच सुरू आहे. परिणामी थकबाकीदार पथकावर आपला रोष काढत आहे. विशेष म्हणजे व्हीडीओ शुटींग होत असल्याने फक्त बाचाबाचीवरच प्रकरण मिटत आहे अन्यथा अनर्थ ही घडू शकतो. पोलीस पथक एकच दिवस सोबत होते. पोलीस पथकासाठी पालिकेला आठ हजार रूपये दररोज मोजावे लागत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी मोरे यांनीच पोलीस पथकावर पैसे खर्च न करता कर वसुली पथकासोबत वसुलीची मोहीम राबविण्यास सांगीतले आहे.नगराध्यक्षांनी केली मध्यस्ती नगर पालिकेच्या कर वसुलीत राजकीय हस्तक्षेप ही सर्वात मोठी अडसर असल्याचे बोलले जाते. मात्र त्याची प्रचिती शुक्रवारी आली. बग्गा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पथक वसुलीसाठी गेले असता दुकानाच्या संचालकांनी मुख्याधिकारी मोरेंसोबत चांगलीच बाचाबाची केली. एवढेच नव्हे तर त्यांनी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना फोन लावला व त्यांनी प्रकरणी मध्यस्ती केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी रोख किंवा धनादेश मिळत नाही तोपर्यंत तेथून निघणार नसल्याचे स्पष्ट सांगीतले. यावर मात्र नगराध्यक्ष जायस्वाल यांनी शनिवारी सकाळी ११ वाजतापर्यंत संबंधीतांचा धनादेश कार्यालयात जमा करण्याची गॅरंटी दिली.