शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेत मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:41 IST

शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देउन्हाळ््यात पाणी पेटणार : यंदाही पुजारीटोलावरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेर मात्र पुजारीटोलाकडे धाव घ्यावी लागणार आहे.मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाणी पेटले होते. नदी, नाले व तलावांत पाणी नसल्याने मागीलवर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तर पाणी टंचाईची झळ गोंदिया शहरालाही बसणार होती. वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाणी पुरवठा खंडीत होणार होता. त्यामुळे पाणी पुरवठयात कपात करण्याची पाळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर आली होती. अशात कधी नव्हे ते सुमारे ९० किमी.अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडला व त्यामुळे मागील वर्षीसारखीच पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत.यंदा मात्र येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार एवढा पाणीसाठा वैनगंगा नदीत असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मागील वर्षी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते . तीच परिस्थिती यंदाही उद्भवणार आहे. त्यादृष्टीने मार्च महिन्याच्या शेवटी प्रयत्न सुरू केले जाणार आहे. यासाठी मजिप्राने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षित केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंथनजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी ज्याप्रमाणे कालवे व नाल्यांतून डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाणी पोहचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाही तशीच योजना केली जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात येणार आहे.शहराला दूषित पाण्याचा पुरवठाशहरात मागील २-३ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील मामा चौकात नालीसाठी खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. यावर मजिप्राने लगेच उपाययोजना केली. मात्र पाईप लाईनमध्ये माती गेल्याने दूषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी