शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

केवळ 'मोबाईल मॅसेज'द्वारे परिणय

By admin | Updated: May 10, 2014 00:37 IST

न्यू स्पोर्ट स्टेडियम मरारटोली बौद्धनगर परिसरात बुद्धिस्ट समाज संघाद्वारे तयार होत असलेल्या वृद्धत्व पार्कमध्ये सुशील बन्सोड व संबोधी नागदेवे यांचा मंगल परिणय पार पडला.

गोंदिया : न्यू स्पोर्ट स्टेडियम मरारटोली बौद्धनगर परिसरात बुद्धिस्ट समाज संघाद्वारे तयार होत असलेल्या वृद्धत्व पार्कमध्ये सुशील बन्सोड व संबोधी नागदेवे यांचा मंगल परिणय पार पडला. या मंगल परिणयाचे वैशिष्ट म्हणजे परिणयासाठी कसल्याही प्रकारचे निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या नाही. केवळ मोबाईलवर संदेश देवून अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेला हा विवाह सोहळा चर्चेचा विषय झाला आहे.आजच्या धकाधकीच्या काळात लग्न सोहळ्यांमध्ये अवाढव्य खर्च करणे परवडणारे नसते. शिवाय प्रत्येक माणूस आजच्या काळात एवढा व्यस्त झाला आहेत की त्याच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव असतो. अशा मंगल परिणयाने वेळ व पैसा या दोन्ही बाबींची बचत होवून एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. साक्षगंध, हळदीची परंपरा, अहेर, भेटवस्तू, हुंडा अशा कोणत्याही प्रकारचा लेन-देण करण्यात आले नाही. बँडवाजा, डीजे व डेकोरेशन यासारख्या आडंबरावर खर्च न करता विवाह हर्षोल्हासात पार पडला. यावेळी सुशील यांनी बुद्धिस्ट संघाचे १५ हजार रूपये शुल्क भरून आजीवन सदस्यता ग्रहण केली. ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहेत. संबोधी ही बी.एससी. व एमएसडब्ल्यू शिक्षित असूनही तिने परिणय सोहळ्याच्या या परिवर्तनासाठी स्वेच्छेने स्वीकृती दिली. याप्रसंगी दोन्ही पक्षाचे अत्यंत सीमित पाहुणे उपस्थित होते. बदलत्या काळात हा विवाह सोहळा युवा वर्गासाठी सामाजिक परिवर्तनाचाच संदेश असून महापुरूषांच्या विचारांच्या अनुकूल आहे.अशा प्रकारच्या परिणय सोहळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिस्ट समाज संघाचे एल्डर पार्क नि:शुल्क उपलब्ध करविण्याचे आवाहन बुद्धिस्ट समाज संघाने केले आहे. कार्यक्रमाचे संचालन डी.एन. रामटेके यांनी, प्रास्ताविक प्रा. आर.एस. मडामे यांनी तर आभार अँड. प्रज्ञा नरेंद्र डोंगरे यांनी मानले. यावेळी संघाचे उमेश नागदेवे, विनोद मोटघरे, डी.डी. मेश्राम संजय गणवीर, दिपेंद्र वासनिक आदी उपस्थित होते.