शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

४२३ गावांत यंदा एकच गणपती

By admin | Updated: August 23, 2016 23:57 IST

गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२५ वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली.

गोंदिया : गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२५ वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. त्यांच्या कार्याची ओळख आजच्या तरूण पिढीला होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य उत्सव म्हणून राबवायचे ठरविले. या उत्सवात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला पाठबळ मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा ४२३ गावांत ही संकल्पना राबविली जात आहे.गहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे. यामुळे गावाची शांतता धोक्यात येत होती. या उत्सवादरम्यान गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४२३ गावांत राबविली जात आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात यावर्षी ९३५ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. ४ हजार ६६० खासगी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.एक गाव एक गणपतीची संकल्पना आमगाव, सालेकसा, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, डुग्गीपार, देवरी, चिचगड, अर्जुनी/मोरगाव, केशोरी, नवेगावबांध या पोलिस ठाण्यांतर्गत राबविण्यात येत आहे. गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत केवळ एका गावात ही संकल्पना साकारली जात आहे. गोंदिया ग्रामीण ठाण्यांतर्गत २० गावांत, रावणवाडीमधील २८ गावांत, तिरोडा ठाण्यातील २५ गावांत, दवनीवाडा ठाण्यांतर्गत १४ गावात, गंगाझरीतील २२ गावांत, आमगावमधील २८ गावांत, सालेकसामधील ६० गावांत, गोरेगावमधील २५ गावांत, देवरी ४१ गावात, चिचगड ४५ गावांत, डुग्गीपारमधील ३८ गावात, नवेगावबांध ठाण्यातील १९ गावात, अर्जुनी-मोरगाव ठाण्यांतर्गत ३६ गावात आणि केशोरी ठाण्यांतर्गत २१ गावात ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्यात येणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून लोकोपयोगी व जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून गावाला शांततेतून समृध्दीकडे नेण्याचा मानस तंटामुक्त गाव समित्यांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)उत्सवात मंडळांना बक्षिसांची खैरातयंदा गणेशोत्स साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना तालुकास्तरापासून विभाग स्तरापर्यंत प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षीसे देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार व तृतीय १० हजार रूपये, जिल्हास्तरावर स्तरावर प्रथम एक लाख, द्वितीय ७५ हजार व तृतीय ५० हजार रूपये, विभागीय स्तरावर प्रथम २ लाख, द्वितीय १ लाख ५० हजार व तृतीय १ लाख रूपये बक्षीस दिले जाणार आहे.या आधारावर सामाजिक उपक्रमया स्पर्धेत भाग घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करावा लागणार आहे. सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात मंडळांनी आपल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. २९ जुलै ते २९ आॅगस्ट यादरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत.