लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुध्दा वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण होत नसून वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे. वृत्तपत्रांच्या छपाई दरम्यान त्यावर सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेते देखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्यापासून सुध्दा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही.वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी बोलावून वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रम आहे. असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.वृत्तपत्रांमुळे कोरोना झाल्याचे एकही उदाहरण नाही.त्यामुळे सत्य,अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी वृत्तपत्रांचाच वापर करावा. वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांनी तोंडाला मास्क लावावे. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. आपण सर्वानी सुध्दा काळजी घ्यावी घरी रहा सुरक्षीत रहा.- डॉ.अनुराग बाहेकर, हृदयरोग तज्ञ गोंदियाजगभरात आणि आपल्या आजुबाजुला घडणाऱ्यां घटनांची अचूक माहिती ही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मिळत असते. लॉकडाऊनच्या काळात लोकमतने अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. वर्तमानपत्र नियमित वाचावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावरुन फेक न्यूज जास्त येतात. परंतु वृत्तपत्र सत्य बातम्या देण्याचे काम करुन समाजात जनजागृती करण्याचे काम करते. कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडले. वृत्तपत्र वाचनामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता वृत्तपत्रांचे वाचन करावे.- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.समाजातील सर्वच घडामोडींचे वास्तव्य चित्रण मांडणारे वृत्तपत्र समाजापर्यंत अचूक बातम्या पोहचवितात. कोरोना विषाणूचा संसर्ग होताच अनेकांनी वृत्तपत्र बंद केले. परंतु कोरोना वृत्तपत्रांमुळे होत नाही तर अधिकाधिक लोकांच्या संपर्कात आल्याने होतो. कोरोनाला हरविण्यासाठी सगळ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच नियमित वृत्तपत्रांचे वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.- अॅड. क्रिष्णा पारधी, सरकारी वकील गोंदियावृत्तपत्र अचूक माहिती देते. सोशल मीडियावरुन अफवा जास्त पसरविल्या जातात. त्यामुळे समाजात आजही वृत्तपत्रे हे विश्वासार्ह माध्यम आहे. वृत्तपत्रातून वाचकांना सविस्तर बातमी कळते. लॉकडाऊनच्या काळात मी स्वत: वृत्तपत्रच वाचले आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना होत नाही त्यामुळे सगळ्यांनी वृत्तपत्र वाचावे.- डॉ. योगेश पटले,वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम गोंदियाछपाई आणि वितरणादरम्यान वृत्तपत्र योग्य रितीने हाताळले जातात. त्यांचे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण केले जाते. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही. जगात आत्तापर्यंत वृत्तपत्रांमुळे कोरोना झाल्याचे ऐकिवात नाही. वृत्तपत्र हे पूर्णपणे सुरक्षित असून ती वाचल्यामुळे अथवा हातळल्यामुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. याला कसलाही वैद्यकीय आधार नाही.ही बाब जागतिक आरोग्य संघटनेने सुध्दा स्पष्ट केली आहे. त्यामुळे कुठलाही संकोच व भीती न ठेवता बिनधास्तपणे वाचकांनी वृत्तपत्रांचे वाचन करावे. मी सुध्दा नियमित वृत्तपत्रांचे वाचन करतो. नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमित हातपाय स्वच्छ धुवावे, वांरवार साबणाने हात धुवावेत.- डॉ.विनायक रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.
वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST
वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी बोलावून वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रम आहे. असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रमच
ठळक मुद्देविविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत : लोकमतचे घरो घरी होत आहे स्वागत