शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांनी केली ई-पीक अॅप नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:12 IST

१५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत : अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईला पात्र ठरण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक अॅपवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. ई-पीक अॅपवर नोंदणी केल्यास शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते. मात्र, यंदा खरीप हंगामात २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ १ लाख १२ हजार ८७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

ई-पीक अॅपवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे शासन व विमा कंपनीने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची झालेली नुकसानभरपाई व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ई-पीक अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी असून, यापैकी आतापर्यंत १ लाख १२ हजार ८७२ शेतकऱ्यांनी ई- पीक अॅपवर नोंदणी केली आहे. तर अर्धे शेतकरी अजूनही यापासून वंचित असल्याने या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपूर्वी ई-पीक अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागेल. 

आतातरी करा पीक पाहणी सन २०२४ च्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणीला सुरूवात झाली असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे. ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. शेतकरी आपल्या स्वतःच्या मोबाइल अॅपवरून सातबारावरील विविध पिकांची नोंदणी करू शकतील. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी, जेणेकरून भविष्यात शासनाकडून अनुदान मिळण्यास अडचण येणार नाही.

तालुका                                  पीक नोंदणी केलेले शेतकरी अर्जुनी मोरगाव                              १६०३५ आमगाव                                       १३८३० गोरेगाव                                        १३२१० गोंदिया                                         १६९३१ तिरोडा                                         २२६०० देवरी                                           १०७६६ सडक अर्जुनी                                १०२७४ सालेकसा                                      ९२२६ एकूण                                       ११२८७२

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीgondiya-acगोंदिया