संजय पुराम : नवयुवकांच्या परिश्रमाचे कौतुकलोकमत न्यूज नेटवर्कककोडी : आत्मविश्वास असेल तर विकासकार्य शक्य होते. या आत्मविश्वासामुळे ककोडी येथील नवयुवकांनी कृषोन्नती शेतकरी उद्योग उभारून दाखविले. या उद्योगाचे भूमिपूजन आ. संजय पुराम यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा गोंदियाद्वारे कृषोन्नती शेतकरी कंपनीची ककोडी येथे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी अतिथी म्हणून के.आर. सराफ, सत्यपाल ठाकरे, सचिन कुंभार, राजू चांदेवार, सविता पुराम, ललन तिवारी, रियाज खान, भारत बंसोड, गणेश सोनबोईर, राजू शाहू, डॉ. अरुण कारवट, बबलू भाटीया, मनीष मोटघरे उपस्थित होते. यावेळी कृषी, पणन, पशुसंवर्धन, उत्पादीत मालाचे योग्य भाव मिळणे, राज्य व केंद्राच्या योजना तसेच बचत गटाविषयी के.आर. सराफ व आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. संचालन मनेंद्र मोहबंशी तर आभार चंदन हिरनानी यांनी मानले. कार्यक्रमाला मनेंद्र मोहबंशी, चंदन हिरवानी, मनोज मेश्राम, कुंभरे, चेतन कुक्कदावरा, सुरेंद्र बंसोड, विरेंद्र कुवरदादरा, अनिल अटलखा, सद्भावना हिरवानी, अनुसया सलामे, जीवन सलामे व शेतकरी महिला-पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आत्मविश्वास असेल तरच विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 01:19 IST