शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:12 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : वैनगंगेचे पात्र पडले कोरडे, बंधाऱ्याचा उपयोग नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना केवळ ७ दिवस पाणी पुरवठा करता येईल ऐवढाच पाणीसाठा वैनगंगेच्या पात्रात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुढील आठवड्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.महिनाभरापूर्वी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बंधाºयाचा सुद्धा कुठलाच उपयोग झाला नसून विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने यंदा एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागणार आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत १७ कि.मी.अंतरावरील डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे १२ हजारावर ग्राहक आहे. त्यांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथून वैनगंगा नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन व्दारे आणले जाते. यामुळे शहरातील जवळपास दीड लाख नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर यंदा ही तिच स्थिती निर्माण झाली आहे.वैनगंगा नदीच्या पात्रात सध्या केवळ ७ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाची सुध्दा चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा होता.त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. कालव्याच्या माध्यमातून प्रथम ३.०१५ एमएमक्यू आणि दुसऱ्यांदा २.५१७ एमएमक्यू पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहोचविण्यात आले होते. तर यंदा देखील तीच स्थिती असून यावर्षी देखील शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोला धरणावरच आहे.शंभर कोटींची योजना ठरतेय नाममात्रशहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र ज्या वर्षी योजना तयार करण्यात आली त्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी विहीर तयार करण्यात आली आहे. त्या परिसरात पाणी राहात नसल्याने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते.त्यामुळे या परिसरात पाणी साचून राहावे याकरिता कायमस्वरुपी बंधारा तयार करण्याची गरज आहे.बंधारा तयार करण्याचा प्रस्तावमहाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या समन्वयातून या ठिकाणी बंधारा तयार केल्यास यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारला पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावाला आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला केव्हा मंजुरी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.दरवर्षी  बंधाऱ्यावर खर्चमागील दोन तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सिमेंटच्या चुंगड्यापासून वैनगंगा नदीच्या पात्रात तात्पुरता बंधार तयार केला जातो.दरवर्षी यासाठी दोन तीन लाख रुपयांचा खर्च केला जातो. मात्र याचा सुध्दा कसलाच उपयोग होत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ जात आहे.सोमवारपासून एकच वेळ पाणी पुरवठावैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सोमवारपासून (दि.१५) शहरवासीयांना दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई