शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ ३२ जणांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:30 IST

Gondia : कोणाला मिळतो लाभ? अर्ज कोठे कराल?

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते आतापर्यंत १२४ जणांचे प्रस्ताव आले. त्यापैकी ३२ प्रस्ताव मंजूर झाले असून, ६३ लाख रुपये सानुग्रह अनुदान शेतकरी वारसाला मिळाले आहे. या योजनेमुळे शेतकरी वारसांना सुविधा निर्माण होऊन शासन मदत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

शेतात काम करीत असताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे आदींसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा मृत्यू होतो, तसेच अपंगत्व येते. 

घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, विविध कारणांमुळे प्रस्ताव मान्य होत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता नसणे हे यातील मुख्य कारण असते. अर्जाच्या तुलनेत कमी प्रमाणात अर्ज मंजूर केले जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

किती प्रकरणे प्रलंबित ? गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचे ८३ प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्राची पूर्तता करणे सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यास वरिष्ठ स्तरावर पाठवून ते अर्ज मंजूर झाल्यास मदत मिळते.

वर्षभरात किती जणांना लाभ? एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३२ जणांच्या कुटुंबीयांना ६३ लाख रुपये सानुग्रह मदत शासनाकडून देण्यात आली आहे.

अर्जात या त्रुट्या निघाल्या घटना घडल्यास त्या घटनेचा पंचनामा, इन्केवेस्ट पंचनामा, पोलिस समरी, एसडीएम समरी असे विविध कागदपत्रांअभावी अर्ज प्रलंबित राहत असल्ल्याने अडचण होत आहे.

कोणाला मिळतो लाभ? शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू होतो. अंगावर वीज पडून मृत्यू होणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. यात शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. अशावेळी मृत शेतकऱ्याच्या वारसांना ही मदत मिळते.

२ लाख अपघात झाल्यास महाराष्ट्र सरकारने ही योजना २००५-०६ सुरू केली. तेव्हा त्याचे नाव 'शेतकरी जनता अपघात विमा योजना' असे होते, ते बदलून 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना' असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी एक लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता. पुढे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता २०१५-१६ मध्ये ही रक्कम वाढवून दोन लाख एवढी करण्यात आली.

अर्ज कोठे कराल? या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी किवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना