आरोपी लोकेश लांडे याने ५ डिसेंबर २०२० रोजी अर्जुनी-मोरगाव येथील एका रेल्वे कर्मचारी महिलेचा विनयभंग केला होता. या संदर्भात गोंदिया रेल्वे पोलिसांनी भादंवि कलम ३५३, ३५४, ३२३, ३३२, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी केला व आरोपी लांडे याला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून २४ तासांच्या आत अटक केली होती. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता महेश चांदवानी व महेश चुटे यांनी सरकाची बाजू मांडली. साक्ष पुरावे व इतर पुरावे ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए आर. ओटी यांनी बुधवारी (दि.८) सुनावणी करताना आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी व २०० रूपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार किशोर ईश्वर, महिला पोलीस नाईक माने, पोलिस नायक चंद्रकांत भोयर, सेलोटे, पोलीस शिपाई नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय यांनी सहकार्य केले.
महिला रेल्वे कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्याला एक वर्षाची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST