शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सडक अर्जुनी तालुक्यात एक मिनिटात लावली एक हजार रोपटी

By अंकुश गुंडावार | Updated: June 27, 2025 16:31 IST

सप्रेम फाउंडेशन मुंबईचा उपक्रम : ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा

सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा येथील राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतने पर्यावरण संवर्धनासाठी सप्रेम फाऊंडेशन च्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत शुक्रवारी (दि.२७) डव्वा येथे एका मिनिटात १ हजार रोपटे लावण्याचा विक्रम करण्यात आला.

सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या पुढाकाराने व सप्रेम फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम शुक्रवारी राबविण्यात आला. यावेळी एक हजार केसर आंबा, इतर झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य भुनेश्वर पटले,पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सडक योजनेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, गटविकास अधिकारी नरेगा डी.एस.लोहबरे, वनक्षेत्र अधिकारी उमेश गोटेफोडे, जिल्हा सहाय्य कार्यक्रम अधिकारी सुरेखा ब्राह्मणकर, तालुका सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरेश कटरे, जागेश्वर लंजे, गटशिक्षणाधिकारी चव्हाण, वनरक्षक दामिनी लांजेवार, राखी काठेवार, अक्षय नंदेश्वर, शालू मेंडे, प्रियंका नागपुरे, वनिता ब्राह्मणकर, प्रिती कोहळे, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डव्वा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी गावात विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग व गावकऱ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी एका मिनिटात एक हजार रोपटी लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

गावात प्लास्टिक बंदीपृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमाणात वाढ होत आहे.याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर होत आहे. हे थांबवायचे असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अश्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया