शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

एक लाख महिला उन्नतीच्या मार्गावर

By admin | Updated: January 21, 2016 01:35 IST

महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

विविध व्यवसायांना चालना : ४४६७ बचत गटांना दिले ९.७९ कोटींचे कर्ज नरेश रहिले गोंदियामहिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या बचत गटांच्या माध्यमातून शासनाकडून विविध व्यवसायांकरिता कर्ज घेऊन आर्थिक प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख ४ हजार ६१० महिला सरसावल्या आहेत. सन २००७ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंत आतापर्यंत ४४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वगळता इतर सात तालुक्यात ९ हजार ५१० बचत गट असून या सात तालुक्यातील ४ हजार ४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख ९० हजार ६०६ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. शासनाने बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा जीवनाचा आधार मिळाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ११३१ गटांपैकी ३११ बचत गटांना ६० लाख ८१ हजार ८२६ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. देवरी तालुक्यात १११४ गटांपैकी २७६ बचत गटांना ३० लाख ७ हजार ९२० रूपयांचे कर्ज, सालेकसा तालुक्यात १०७२ गट असून त्यांना ३ कोटी १९ लाख ८८ हजार ५८४ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. आमगाव तालुक्यात १११८ गटांपैकी ३१२ बचत गटांना ६६ लाख ८९ हजार ६५८ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. गोरेगाव तालुक्यात १४५६ गटांपैकी ४१३ बचत गटांना ७६ लाख १६ हजार ६८५ रूपयांचे कर्जवाटप केले आहे. तिरोडा तालुक्यात १६३६ गटांना २ कोटी ८५ लाख ७७ हजार ५९२ रूपये तर गोंदिया तालुक्यात १९८३ गटांपैकी ४३८ बचत गटांना १ कोटी ४० लाख ३४१ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेतून महिला जिल्ह्यात सर्वात जास्त शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बचत गटांची संख्या त्याखालोखाल आहे. जिल्ह्यातील १५ बचत गटांनी स्वत:च्या दुग्ध डेअरी सुरू केल्या आहेत. महिलांनी कुठलाही पैसा खर्च न करता अगरबत्ती, मेनबत्ती, पोल्ट्री फार्म, आलू लागवड आदी कामे केली आहेत. ग्रामीण भागातील महिला आता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उन्नती साधण्याचा ध्यास घेत आहेत.