शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांची दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:19 IST

येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : दोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे घेऊन जात असताना दीड लक्ष रुपयांची दारु पकडली. ही कारवाई गोंदिया येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे अवैधरित्या दारु वाहून नेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.बुधवारी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास एस.एस.जे. महाविद्यालयानजीक नाकाबंदी करीत असतांना विशेष पथकाला एक चारचाकी वाहन दिसून आले. एमएच २०/बीएन-३६२६ या मारुती सुझूकी रिट्स कारमध्ये येथील बाजार चौकातून अवैधरित्या देशी दारु भरण्यात आल्याची गुप्त माहिती बातमीदाराने दिली होती.या आधारावर वाहन थांबविण्यात आले. त्याची तपासणी केली असता सुमारे दीड लाख रुपयाची देशी दारु या वाहनात आढळून आली. यावरुन दिलीेप आसन्ना कुचनकार (३२) व मुकेश दामोधर दुपारे (२५) रा. वडसा जि.गडचिरोली यांना पकडण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता ही दारु आंबेडकर वार्ड वडसा येथील अनिल माधोराव निमजे (२८) यांची असल्याचे त्यांनी सांगीतले. सदर दारु मलकाम अ‍ॅड ब्रदर्स देशी दारु दुकानाचा नोकरनामा असलेले मालक धर्मूकुमार कुदरुपाक्का यांचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली.विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे यांचे फिर्यादीवरुन दिलीप कुचनकार, मुकेश दुपारे, अनिल निमजे व धर्मूकुमार कुदरुपाक्का या आरोपीविरुध्द म.दा. कायद्याच्या कलम ६५, ६५ई, ७७ अ तसेच भादंवि १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दारु वाहून नेणारी कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पो.उपनिरीक्षक महेंद्र शहारे, पोलीस हवालदार थेर, तुरकर, कावळे, पटले, बिसेन, बोपचे, रहांगडाले, मेश्राम, कुरसुंगे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस