शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पोराची हजेरी रजिस्टरवरच; एकाच कामासाठी दोन अँपची गरज काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:57 IST

ग्रामीण भागात बसतोय नेटवर्कचा फटका : नेटवर्कची अडचण ठरतेय बाधक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या अँप्लिकेशननमधील अटेंडन्स बोटाद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करावयाची होती. परंतु, आधीच एमडीएम अँपवर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवली जात आहे. त्यामुळे पुन्हा स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे संयुक्तिक नसल्याची माहिती आहे. 

स्विफ्ट चॅट अँपवर हजेरी बंधनकारक शाळांमधील शिक्षकांनी स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपद्वारे आपल्या वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे, परंतु आधीच एमडीएम अँपद्वारे ऑनलाइन नोंदणी होत असल्याने पुन्हा हजेरीसाठी दुसरा अँप वापरल्यास एकाच कामात शिक्षकांचा वेळ जाणार असल्याने स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपचा जिल्ह्यातील शिक्षक वापर करीत नाही. अशी माहिती शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

शाळांमध्ये हजेरी रजिस्टर व एमडीएम अँपवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एमडीएम अॅप तसेच रजिस्टरवर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. 

गुरुजींची अडचण काय? ग्रामीण व दुर्गम भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यात आधीच एमडीएम अँपचा वापर केला जात असल्याने स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपद्वारे हजेरी घेतली जात नाही.

"एमडीएम अँपवर ऑनलाइन हजेरी भरली जाते. सोबतच रजिस्टरवर हजेरी घेतली जाते. त्यात पुन्हा स्विफ्ट चॅट अँपचा वापर करणे, म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दर्शविल्यासारखे होईल. त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे अँपवरुन हजेरी घेणे शक्य नाही."- एस. यू. वंजारी, शिक्षक.

"एमडीएम अँपवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जात आहे. ऑनलाइन नोंदणी होत आहे. तसेच रजिस्टरवर सुद्धा हजेरी घेतली जाते. त्यामुळे स्विफ्ट चॅट अँपचा वापर केला जात नाही." - सुधीर महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गोंदिया,

टॅग्स :gondiya-acगोंदियाzp schoolजिल्हा परिषद शाळा