शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला गरिबांच्या झोपडीमध्ये एक पणती लावण्याचेही झाले वांधे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:29 IST

खाद्य तेलाच्या भाववाढीचा परिणाम : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : दिवाळीचा सण तोंडावर आला असून एकाएकी तेलाचे भाव खूप वाढले आहे. सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहे. सर्वसामान्य माणूस सोयाबीनचे तेल खातात. पण, सोयाबीनच्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीला गरिबाच्या झोपडीत एक तरी पणती लागणार का? अशी अवस्था झाली आहे.

दिवाळी म्हणजे तेजोमयी सण असल्याने घरोघरी पणत्यांची रांग लागते. मोठ्या प्रमाणात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. एकाएकी दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढल्याने दिवाळीचे नियोजन कोडमडले आहे. गोरगरिबांच्या झोपडीपुढे आता एक दोनच पणत्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य गोरगरीबही दिवाळीचा सण उत्साहात साजरे करतात. त्यांचेही एक छोटे-मोठे बजेट तयार असते. त्या बजेटमध्येच गरीब माणूस आपली दिवाळी साजरी करतो. अन्नधान्य, किराणा यांचे भाव वाढले की त्याचे बजेट ढासळते. दिवाळीच्या दिवसात शेव, चकली, अनारसे, चिवडा असे पदार्थ गोडधोडासोबत करावे लागतात. मात्र तेलाचे भाव वाढल्याने या फराळाच्या पदार्थावरही कात्री लागणार आहे. यंदाची दिवाळी आटोक्यात साजरी होणार आहेत. 

दिवाळीत करावी लागतेय काटकसरअनेक बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये प्राप्त झाले. काही बहिणींच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. ज्यांना पैसे मिळाले त्या बहिणींनी स्वतः साठी साडी व नवीन कपडे न घेता मुलाबाळांसाठी कपडे खरेदीचे नियोजन केले आहे. काही बहिणींनी आपल्या घरधन्यासाठी काटकसर करून नवीन कपडे खरेदी केले आहे. नाममात्र पेंशात यंदाची दिवाळी गोरगरिबांच्या घरी साजरी होणार असून त्यांना वाढलेल्या तेलाच्या भावाचा व इतरही महागाईचा फटका गरिबांना बसला आहे. तरीही दिवाळीचा सण कुटुंबासह आनंदात आपापल्या परीने साजरा करण्याचा बेत सर्वांनी आखला आहे

टॅग्स :wardha-acवर्धा