शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

खरेदीसाठी ‘जुना’ आणि परतीसाठी ‘नवा’ धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शंभर शासकीय धान खरेदी केंद्रावरुन ४ नोव्हेबरपासून धान खरेदीला सुरूवात झाली आहे. खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या दोन्ही विभागाने १ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. यंदा या दोन्ही विभागाच्या माध्यमातून ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : बारदान्यावरील खर्चात कपात, निकृष्ट बारदान्याने शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला दरवर्षी धान खरेदीसाठी जवळपास १ कोटी बारदाना लागतो. यापैकी ५० टक्के नवीन बारदाना दरवर्षी नवीन खरेदी केला जातो. मात्र खरेदी केलेला बारदाना परत येत नसल्याने शासनाला दरवर्षी भूर्दंड बसतो. मागील वर्षीपासून हा खर्च वाचविण्यासाठी शासनाने या दोन्ही विभागाने जुन्यातच भागवा हे धोरण लागू केले होते. त्यानंतर यंदा धान खरेदीसाठी जुना आणि धानाची भरडाई करुन तांदूळ परत करण्यासाठी नवीन बारदाना वापरण्याचे निर्देश दिले आहे.खरेदीसाठी वापरला जाणारा जुना बारदाना फारच निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे.जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शंभर शासकीय धान खरेदी केंद्रावरुन ४ नोव्हेबरपासून धान खरेदीला सुरूवात झाली आहे. खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या दोन्ही विभागाने १ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. यंदा या दोन्ही विभागाच्या माध्यमातून ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने नियोजन केले आहे.मात्र बारदान्याचे नियोजन अद्याप झाले नसल्याची माहिती आहे. आदिवासी विकास महामंडळाला खरीप हंगामात २० लाख तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ७५ लाख बारदाना लागणार आहे. सध्या स्थितीत या दोन्ही विभागांकडे जुनाच बारदाना उपलब्ध आहे. शासनाने अद्यापही नवीन बारदाना पुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या नाही. येत्या तीन चार दिवसात दोन्ही विभागाच्या केंद्रावर नवीन बारदाना येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धान खरेदी करताना बारदान्याचे नियोजन हे खरेदीसाठी जुना आणि राईस मिर्लसला धान उचल करण्यासाठी नवीन बारदाना देऊन त्याच बारदान्यात भरडाई केलेला तांदूळ परत करण्याचे निर्देश दिले आहे. परिणामी सध्या सर्वच केंद्रावर जुन्या बारदान्यात धान खरेदी केली जात आहे. हा बारदाना संपल्यानंतर नवीन बारदान्याची गरज भासल्यास तो खरेदीसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जुना आणि व्यापाऱ्यांना नवा अश्या धोरणाने येथे सुध्दा शेतकऱ्यांचीच उपेक्षा केली जात आहे.आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केंद्राना पुरविण्यात आलेला बारदाना फारच निकृष्ट दर्जाच्या असल्याची ओरड संस्थाचालक आणि शेतकºयांची आहे. त्यामुळे अशा बारदान्यात धान विक्रीसाठी न्यायचे कसे प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.बारदान्याचे पैसे द्याकाही शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर स्वत:च्या बारदान्यात धान घेऊन जातात. बरेचदा हा बारदाना ठेऊन घेतला जातो अथवा त्याऐवजी दुसरा बारदाना दिला जातो. मात्र यंदा आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोघांकडील बारदाना अंत्यत निकृष्ट दर्जाचा आहे. त्याचा एकदा वापर केल्यानंतर तो फेकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बारदान्याऐवजी त्याचे पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.परत करण्याची सक्तीया दोन्ही विभागाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाºया धानाची राईस मिलर्सच्या माध्यमातून भरडाई केली जाते. त्यानंतर भरडाई केलेला तांदूळ स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो.मात्र राईस मिलर्स धानाची उचल केल्यानंतर भरडाई करुन तांदूळ परत करताना बारदाना परत करीत नव्हते.त्यामुळे दोन तीन लाखांच्यावर बारदाना राईस मिलर्सकडे पडून होता. दरम्यान हा बारदाना परत मागविण्यासाठी शासनाने बारदाना परत न करणाऱ्या राईस मिलर्सवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.त्यानंतर त्यांनी बारदाना परत केला. हेच धोरण यंदा सुध्दा लागू केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी