शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पांगोलीचा जुना पूल झाला आता बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. या कामामुळे या ठिकाणी २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीवरील जुन्याचे पुलाचे रुपातंर आता बंधाऱ्यात करण्यात आले. यामुळे पाणीसाठा वाढविणे शक्य होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे.शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. या कामामुळे या ठिकाणी २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, उपअभियंता सोनाली ढोके, शाखा अभियंता तुषार मानकर व शाखा अभियंता वसंत राऊत यावेळी उपस्थित होते. दगडी बांधकाम व पाईपचा वापर करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अन्य गावांचा संपर्क सुरळीत ठेवण्याकरिता नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.  दगडी बांधकाम असलेला जुना पूल निरुपयोगी पडून होता. जलसंधारण विभागाने जिल्हा नियोजनचा २० लाख रुपये निधी खर्चून या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून टाकाऊतून टिकाऊ असे नाविन्यपूर्ण काम केले. या ठिकाणी आता २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. कधी कधी शेवटच्या एक पाण्यामुळे खरीपाच्या धान पिकाचे नुकसान होते आता शाश्वत पाणी साठा निर्माण झाल्यामुळे नुकसान टाळता येणार आहे. जलसाठा तयार झाल्याने या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी सुद्धा भरपूर वाव राहणार आहे.८० हेक्टरला होणार सिंचन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली. जलसंधारण विभागाने जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून सिंचन क्षमता वाढीसाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या परिसरात पर्यटनाला वाव असून या अनुषंगाने विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या जलसाठ्यामुळे अंदाजे ५० हेक्टर खरीपचे व अंदाजे ३० हेक्टर रब्बीचे क्षेत्र व भाजीपाला पिकाला सिंचित करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांचे लहान गट तयार करून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी महाऊर्जा संस्थेला प्रस्ताव पाठविण्याची विनंती कृषी विभागाला पत्राद्वारे केली आहे. तसेच हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी नगर परिषदेला पत्र पाठविण्यात आल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार - नदीपात्रात खोलीकरण झाल्याने बोटिंग करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी विकसित करता येऊ शकते. या परिसरालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती स्थळ असून या ठिकाणी वर्षातून दोन वेळा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याठिकाणी सौंदर्यीकरण केल्यास हा भाग पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतो अशी माहिती अनंत जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.  

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प