शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:43 IST

तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे.

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण पदे रिक्त : नागरिकांची पायपीट वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे.येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी चोपा, मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव, बालविकास प्रकल्प अधिकारी, नगर पंचायत मुख्याधिकारी, दुय्यम निबंधक, कारागीर बहुउद्देशीय संस्था सचिव, सहाय्यक भूमि अभिलेख अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी महत्त्वाच्या पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाशी आणि पंचायत समितीशी नागरिक व शेतकऱ्यांना नेहमी काम पडते. मात्र अधिकारीच नसल्याने त्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. गावाचा विकास साधण्यासाठी व गरजू व्यक्तीना आवश्यक सवलतीचा लाभ घेण्यासाठी पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी यांचा या कार्यालयाशी नियमित संबंध येतो. मात्र अनेक महत्त्वपूर्ण पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना निर्णय घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब अनेकदा तालुक्यातील नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही.लाभार्थी प्रतीक्षेतगोरेगाव तालुक्याची दोन विधानसभा क्षेत्रात विभागणी होवून दोन आमदार या तालुक्याला लाभले आहेत. त्यांनी आपआपल्या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण अंमलबजावणी करणारे प्रभारी अधिकारी असल्याने विकास कामे रखडली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मावा तुडतुडा, अतिवृष्टी, दुष्काळी निधीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीFarmerशेतकरी