शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:24 IST

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांनी केला आहे.आदिवासींच्या संशोधनासाठी कार्यरत असलेल्या या कार्यालयात आदिवासींच्या संशोधनासंबधी माहिती, अनेक संदर्भ पुस्तके, सर्वेक्षण, मौल्यवान पुरावे, छायाचित्रे जतन करून ठेवलेली आहेत. संशोधनाचे कार्य अविरतपणे करण्याचे काम या संस्थेने केलेले आहे. ही संस्था आदिवासींची संस्कृती व ग्रंथाचे जतन करण्याचे काम करीत आहे. ही संस्था मागील पन्नास वर्षे आदिवासींच्या संशोधनाचे कार्य करीत आहे. देशातील नामवंत संस्था म्हणून गौरविल्या गेलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या संस्थेचा गौरव करण्यात आलेला आहे. या संस्थेस सरकारने स्वायत्तता दिलेली आहे. आदिवासींची संस्कृती व वैशिष्टये जतन करणाऱ्या अशा संस्थांवरील हल्ला हा दुर्दैवी व निषेधार्थ आहे. या घटनेचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. सदर घटनेची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव डॉ. एन. डी. किरसान, माजी सभापती श्रावण राणा, माजी सभापती हिरालाल फाफणवाडे, शिवानंद फरदे, सुभाष चुलपार, आंनद चजे, मोहन राऊत, टेकेश्वर सोयाम, विजय मडावी यांचा समावेश होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी