शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

१२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपट्ट्यांचे वाटप : अखेर मगरडोह ग्रामवासीयांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मगरडोहला अखेर वनहक्क अधिकार २००६ अंतर्गत १२२ एकरातील गौण वनउपजांचे संरक्षण व्यवस्थापन व विनिमय करण्याचे स्वामित्व हक्क प्राप्त झालेले आहेत.सन २०१२ पासून तत्कालीन उपसरपंच तुुलाराम भोगारे यांनी सामुहिक वनहक्काचे प्रकरण आवश्यक कागदपत्रांसह महसूल विभागात सादर करुन त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. आपल्या गावासाठी प्रयत्न करीत असलेल्या वडिलाची जवाबदारी स्विकारत विद्यमान सरपंच देवविलास तुलाराम भोगारे आणि सामुहिक वनहक्क समितीचे सचिव देवेंद्र गावळ यांनी गावकऱ्यांसाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ग्रामपंचायत मरगडोहला यश आले. पट्ट्यांचे वितरण स्थानिक उपविभागीय अधिकारी देवरी यांच्या दालनात विद्यमान सरपंच आणि ग्रामवासीयांना उपविभागीय कार्यालयामार्फत वितरित करण्यात आले. प्राप्त झालेल्या पट्ट्याच्या क्षेत्रात उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनात शासन निर्णयाच्या अधिन राहून ग्रामविकास आराखडा तयार केलेला आहे.त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. यासाठी आ.संजय पुराम व माजी आ.रामरतन राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार विजय बोरुडे यांना ग्रामपंचायत मगरडोह व सामुहिक वन हक्क समिती यांच्यासह संपूर्ण ग्रामवासीयांनी धन्यवाद देत आभार मानले आहे. या समितीच्या निर्मितीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी सहकार्य केले ते उपसरपंच महेंद्र गावळ, वनविभागाचे सर्वेअर शेख, उपविभागीय कार्यालयाचे फरकडे, ग्यानीराम गावळ, रमेश आचले, विनोद आचले, मनोहर भोगारे, धनलाल भोयर, धनराज कोरेटी, संगणक चालक हेमंत करंडे, रोजगार सेवक लालचंद भोयर यांच्यासह सर्व ग्रामवासीयांनी सहकार्य केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforest departmentवनविभाग